जाहिरात

Dombivli News: पावासाचा फायदा घेत डोंबिवलीत पाच चोरांची टोळी सक्रिय, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण, CCTV Video

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Dombivli News: पावासाचा फायदा घेत डोंबिवलीत पाच चोरांची टोळी सक्रिय, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण, CCTV Video
Dombivli Thieves CCTV Video Viral

Dombivli Thieves Viral Video : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक ठिकाणी झाडे कोसळली,रस्त्यांवर तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.एकीकडे नालेसफाईतील हलगर्जीपणामुळे पाणी साचण्याचा प्रश्न गंभीर झाला असतानाच दुसरीकडे डोंबिवलीतील निवासी भागात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी निवासी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.रस्ते जलमय झाले असून अनेक घरांमध्ये आणि काही कंपन्यांच्या परिसरातही पाणी शिरले आहे. नालेसफाई वेळेत आणि योग्य प्रकारे न झाल्याने परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.त्यामुळे महापालिका आणि एमआयडीसी प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चोरट्यांच्या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली

दरम्यान,या पावसाचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली आहे.भर पावसात बंद घरांना लक्ष्य करत चोरीच्या घटना घडल्या आहेत.सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच जणांची टोळी परिसरात फिरताना दिसत असून काही घरांमध्ये चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.या चोरट्यांकडे धारदार शस्त्रे असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणाचा तपास मानपाडा पोलिसांनी सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.या टोळीला लवकरात लवकर अटक करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com