राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik Crime News : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच नाशिकमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत जबरदस्तीने अनेकदा शरीरिक संबंध ठेवलं. तसच त्या महिलेकडून जवळपास 14 तोळे सोन्याचे दागिने आणि 4 लाख 63 हजार 600 रुपयांच्या रक्कमेचा अपहार केला. याप्रकरणी पीडित महिलेनं इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी तौफिक वसियोद्दीन सय्यद याच्याविरोधात बलात्कार आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला.
सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर..
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा तिच्या पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर वर्ष 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयित तौफिक याच्याशी संपर्क आला होता. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. याच काळात संशयिताने पीडित महिलेला लग्नाचे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते.
नक्की वाचा >> Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये नागरिक भयभीत, सेंच्युरी ग्राउंडजवळ मोठा अनर्थ टळला, 'त्या' तरुणाला अखेर पकडलं
स्वतःला कॅन्सर झाल्याचं कारण दिलं अन्..
महिलेच्या तक्रारीनुसार, लग्न करणार असल्याचे सांगून संशयिताने तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच स्वतःला कॅन्सर झाल्याचे कारण देत वेळोवेळी महिलेकडून पैसे घेतले. संशयिताने महिलेचे जवळपास 14 तोळे सोन्याचे दागिने आणि तब्बल 4 लाख 63 हजार 600 रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि अपहाराचे गंभीर गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world