जाहिरात

Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये नागरिक भयभीत, सेंच्युरी ग्राउंडजवळ मोठा अनर्थ टळला, 'त्या' तरुणाला अखेर पकडलं

उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात गुन्हेगारीची गंभीर घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये नागरिक भयभीत, सेंच्युरी ग्राउंडजवळ मोठा अनर्थ टळला, 'त्या' तरुणाला अखेर पकडलं
Ulhasnagar Crime News Today

Ulhasnagar Crime News Today : उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात गुन्हेगारीची गंभीर घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी एका 20 वर्षीय तरुणाला देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह अटक केली आहे. रोहित सुनील मोरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो उल्हासनगर-1 परिसरातील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पोलीस शिपाई बाबू जाधव यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, आरोपी सी ब्लॉक परिसरातील सेंच्युरी ग्राउंडजवळ शस्त्र घेऊन येणार होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. हे शस्त्र उत्तर प्रदेशातील मोहित आहूजा नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याची प्राथमिक माहिती आहे.

नक्की वाचा > Instagram वर मुस्लीम मुलीचं हिंदू तरुणीसोबत जडलं प्रेम, लग्नाचा निर्णय घेताच कुटुंबीयांची सटकली अन्..

उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीत झाली मोठी वाढ 

पोलीस मोहित आहूजाचा शोध घेत असून हे शस्त्र कुठून आणण्यात आले आणि त्याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.याप्रकरणी पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. उल्हासनगर मध्ये गुन्हेगारीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुणावर भर रस्त्यात हल्ला झाला. एवढेच नाही तर गोळीबारीची घटना देखील घडली. गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीये. आता या तरुणाला अटक करण्यात आली आहे, या प्रकरणात मोहित अहुजाचा शोध सुरू आहे. मोहित अहुजा नक्की कोण आहे?याचा शोध घेणं आवश्यक आहे.

नक्की वाचा >> Missing Link News : मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा श्वास मोकळा, 'या' घाटाचा प्रवास टाळता येणार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com