जाहिरात

Dr. Gauri Garje Case: आत्महत्येची थेट शक्यता नाही, पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; तपास 4 मुद्द्यांवर सुरु

Dr. Gauri Garje Case: डॉ. गौरी गर्जे- पालवे यांनी आत्महत्या केली नसून ही पतीनेच हत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोस्टमॉर्टम प्राथमिक अहवालातून याबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

Dr. Gauri Garje Case: आत्महत्येची थेट शक्यता नाही, पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; तपास 4 मुद्द्यांवर सुरु

राहुल कुलकर्णी, पुणे

Dr. Gauri Garje Case: मंत्री पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. डॉ. गौरी गर्जे- पालवे यांनी आत्महत्या केली नसून ही पतीनेच हत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोस्टमॉर्टम प्राथमिक अहवालातून याबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. गौरी यांचा हत्या आहे की आत्महत्या याचा तपास चार मुद्द्यांवर सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

(नक्की वाचा-  Dr Gauri Garje Death Case: मोठी बातमी! गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडेंच्या पीएला अटक)

  1. डॉ. गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याची बाब अनंत गर्जे घरी आल्यानंतर उघडकीस आली. अंनत गर्जे यांना पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या काही मिनिटापूर्वीच गौरी आणि अनंत यांचे भांडण झाले होते. या भांडणानंतर अनंत हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले होते. मात्र अनंत गर्जे यांनी गौरी यांना अनेक फोन केले मात्र त्यांनी उचलले नाही. यावेळी अनंत गर्जे पुन्हा घरी परतले आणि दरवाजा ठोठावला. आवाज देऊनही गौरी यांनी दार उघडलं नाही. यावेळी अनंत यांनी 30 व्या मजल्यावरुन रेफ्यूज एरियातून संरक्षण भाग तोडून आत प्रवेश केला. मात्र येथून प्रवेश करून संरक्षणात्मक भाग तोडणं एवढं सोपं आहे का? याचा खातरजमा पोलीस करत आहेत.
  2. गौरी यांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वात आधी घरी पोहोचणारे अनंत गर्जे होते. त्यावेळी पोलीस पोहोचण्याआधीच गौरी यांचा मृतदेह खाली काढल्यानंतर सीलिंगला असलेला गळफासाचा सगळाच भाग का काढला? या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत.
  3. गौरीच्या गळ्याभोवती काही जखमा असल्या असल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे आत्महत्येपूर्वी गौरीच्या गळ्यावर जखमा कशा? असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे.
  4. गौरीच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात डॉक्टरानी आत्महत्याची थेट शक्यता वर्तवलेली नाही. त्यामुळे गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, अशा सर्व अँगलने तपास सुरू  असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com