Ambarnath News : अंबरनाथच्या हेरंब मंदिरासाठी ड्रेस कोड लागू, कोणते कपडे घालण्यास बंदी?

Amabarnath News : लग्न समारंभाला किंवा पार्टीला जाताना ड्रेस कोड फॉलो करतो, मग मंदिरात येताना सभ्य कपडे आपण का घालू शकत नाही? असा सवाल हेरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमण यांनी विचारला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, अंबरनाथ

अंबरनाथच्या हेरंब मंदिराने मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. मंदिरात येताना सद्गुणी पोशाखात यावं, फाटक्या जीन्स, स्कर्ट आणि असाभ्य कपडे घालून मंदिरात येऊ नये, असं आवाहन मंदिर समितीने भाविकांना केलं असून याबाबतचा फलक मंदिराबाहेर दर्शनी भागात लावण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला होता. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या हेरंब मंदिराने सुद्धा रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आपण लग्न समारंभाला किंवा पार्टीला जाताना ड्रेस कोड फॉलो करतो, मग मंदिरात येताना सभ्य कपडे आपण का घालू शकत नाही? असा सवाल हेरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमण यांनी विचारला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - Economic Survey : आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर; GDP बाबत महत्त्वपूर्ण अंदाज आला समोर)

भाविकांना अनेकदा तोंडी सूचना देऊन झाल्या. मात्र तरीही सुधारणा होत नसल्याने अखेर मंदिराच्या बाहेर दर्शनी भागात ड्रेस कोड बाबतच्या सूचनांचा फलक लावण्याची वेळ आमच्यावर आल्याचं सोमण यांनी सांगितलं. 

Advertisement

( नक्की वाचा : Ajit Pawar : दमानियांच्या पुराव्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार? अजित पवारांनी दिलं उत्तर )

दक्षिण भारतात प्रत्येक मंदिरात जाताना लुंगी घालावी लागते. आम्ही निदान काय घालावं याची सक्ती करत नाही, परंतु किमान सभ्य कपडे घालावेत, इतकीच आमची भाविकांकडून अपेक्षा असल्याचं अभय सोमण म्हणाले.

Advertisement
Topics mentioned in this article