Nashik News : नाशिक शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार; प्रमुख नाक्यांवर फ्लायओव्हर अन्...

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं जात आहे. द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंडरपासला मंजुरी मिळाली आहे. याशिवाय आता द्वारका ते नाशिक रोडपर्यंत तब्बल ८ किलोमीटर लांब रस्ता दहा लेनचा करण्याच्या योजनेला केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे शहरातील सर्वाधिक गर्दीच्या मार्गांवरील एका भागात वाहतूक सुगम होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या मार्गावर व्हाइट टॉपिंगचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र यात बदल करीत डांबरीकरणाचा प्रस्ताव निश्चित करण्यात आला आहे. 

२४४ कोटींची मंजुरी...

साधारण २४४ कोटींच्या या नव्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. आता पालिकेकडून या प्रकल्पाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी आहे. द्वारकेहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरुन नाशिक रोड, सिन्नर आणि शिर्डीच्या दिशेने मोठ्या संख्येने वाहनं ये-जा करीत असतात. यामुळे द्वारका चौक ते दत्त मंदिर सिग्नलपर्यंत मोठी गर्दी असते. चार वर्षांपूर्वी भारतमाता योजनेच्याअंतर्गत या भागात फ्लायओव्हर तयार करणार होते. मात्र नियो मेट्रो योजनेमुळे काम पुढे जाऊ शकलं नाही. आता केंद्र सरकारकडून नियो मेट्रो योजना रद्द केल्यानंतर रस्ते चौपद्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नक्की वाचा - Nashik News : नाशिक विमानतळाचा होणार कायापालट; कसं असेल विस्तारीकरण, प्रवासी क्षमता कितीने वाढणार?

दिल्लीच्या बैठकीनंतर एनएचएआयने दिली अंतिम मंजुरी...

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सादर केलेल्या सुधारित प्रस्तावावर दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर एनएचएआयने अंतिम मंजुरी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, निओ मेट्रो प्रकल्प स्थगित करण्यात आला असला तरी, भविष्यात नियमित मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने रस्त्याच्या मध्यभागी मेट्रो खांब बसवण्याची तरतूद करणार आहेत. त्यामुळे  काठे गली, बोधले नगर, गांधी नगर आणि उपनगर यासारख्या प्रमुख चौकांवर सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी कायम राहू शकते.