प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
Nashik Kumbh Mela : नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये महाकुंभमेळा भरणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास प्रकल्प राबवण्यात येत असून भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन विमानतळाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली जाणार आहे.
मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी
नवीन विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असेल. या प्रकल्पामुळे नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक, व्यापारी व कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. जलद कार्गो सुविधा, आधुनिक लॉजिस्टिक्स व कोल्ड चेन व्यवस्थेमुळे द्राक्षे, कांदे, डाळिंब यांसारख्या कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वेगवान होणार आहे. परिणामी शेतकरी, उद्योजक व स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कुंभमेळ्याच्या कालावधीत वाढणारी प्रवासी संख्या, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, एअर अॅम्ब्युलन्स, सुरक्षा दलांची हालचाल आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी हे विमानतळ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
नाशिक विमानतळ जुने व नवीन
टर्मिनल क्षेत्रफळ : जुने ६,२६० चौ.मी.। नवीन १८,२५० चौ.मी.
प्रवासी क्षमता (प्रति तास): जुने ३०० । नवीन १,००० प्रवासी
उड्डाण सुविधा: जुने फक्त देशांतर्गत। नवीन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय
चेक-इन व्यवस्था : जुने मर्यादित। नवीन २४ चेक-इन
काउंटर व दुहेरी उंचीचा हॉल
सुरक्षा तपासणी : जुने मर्यादित। नवीन ८ हँड बॅगेज एक्स-रे युनिट्स
आंतरराष्ट्रीय सुविधा : जुने अनुपलब्ध। नवीन इमिग्रेशन, कस्टम्स, ड्युटी फ्री, लाउंज, एटीएम, चलन विनिमय
बँगेज हैंडलिंग : जुने साधे। नवीन अत्याधुनिक बॅगेज हैंडलिंग सिस्टीम
प्रस्थान गेट्स: जुने मर्यादित। नवीन ७ गेट्स (५ इन कॉन्टॅक्ट, २ रिमोट)
एप्रन व टॅक्सी लेन: जुने मर्यादित। नवीन ७३,००० चौ. मी. एप्रन व ४३,००० चौ.मी. टॅक्सी लेन
विमान पार्किंग क्षमता : जुने ६ विमाने। नवीन १८ विमाने
विमान ये-जा क्षमता: जुने १०। नवीन ५०० (२५० लैंडिंग, २५० टेक-ऑफ)
एरोब्रिज : जुने नाही। नवीन ६ एरोब्रिज
एस्केलेटर व लिफ्ट्स : जुने नाही। नवीन ९ एस्केलेटर व १० लिफ्ट्स
पार्किंग सुविधा: जुने मर्यादित। नवीन ७०० कार, २०० टॅक्सी व १० बस
नागरी एन्क्लेव्ह: जुने पारंपरिक। नवीन IATA मानकांनुसार डिझाइन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world