जाहिरात

E Water Taxi : देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, पाहा काय आहेत वैशिष्ट्ये?

मुंबईत वाहतूक यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत.

E Water Taxi : देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, पाहा काय आहेत वैशिष्ट्ये?
मुंबई:

ई-वॉटर टॅक्सीबाबतची मुंबईकरांची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार आहे. ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केल्या आहेत.  स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकी दरम्यान त्यांनी या सुचना केल्या. मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे  मंत्री राणे यांच्याशी महावाणिज्य दूत ओस्टबर्ग यांनी ई-वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. यावेळी ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईत वाहतूक यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. स्वीडनच्या कँडेला कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांनी नागरिकांची सुरक्षितता, वातावरण, पर्यावरण यांचा विचार करावा. शिवाय वॉटर टॅक्सीचे नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत. कंपनीला लागणाऱ्या परवान्याबाबत राज्य सरकार दक्षता घेईल असं ही यावेळी राणे यांनी स्पष्ट केलं. 

ट्रेंडिंग बातमी -  CBSEची घोषणा झाली पण आव्हाने काय? पालक- विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर...

ओस्टबर्ग यांनी महाराष्ट्रातील पोर्टच्या विकासात स्वारस्य दाखवित म्हणाले की, स्वीडनची कँडेला कंपनी येवून सर्व माहितीचे सादरीकरण करेल. त्यानंतर वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करू, असं ही त्यांनी स्पष्ट केलं. महावाणिज्यदूत  ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देवू इच्छित असल्याने सांगितल्याने मंत्री राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Folk artist trouble: कला केंद्रांचा डान्सबार! लावणी सम्राज्ञीच्या आरोपाने खळबळ, घेतला मोठा निर्णय

स्वीडन कंपनीने राज्य सरकारला पोर्टच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करावा असं ही सांगण्यात आलं आहे. वाहतुकीसाठी सुलभ ठिकाणांची पाहणी करून देशात एक नंबर होईल, असे मॉडेल पोर्ट विकसित करावे. यासाठी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून एप्रिलमध्ये पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही आदेश ही राणे यांनी दिले आहेत. ओस्टबर्ग यांनी पोर्टचा विकास, स्वच्छता, सोयी-सुविधा, गुंतवणुकीबाबतची माहिती यावेळी दिली. त्यामुळे मुंबईत ई-वॉटर टॅक्सी लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: