अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. मोबाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकणाच्या चौकशीसाठी ईडीने ही छापेमारी केली आहे. मोबाईल ॲप्सद्वारे पॉर्नोग्राफी कंटेंटचे प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशनसंबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडी आज राज कुंद्रा यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ईडीचे छापे कथित पोर्नोग्राफी नेटवर्क आणि राज कुंद्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या चॅनेलशी संबंधित आहेत. ज्यांच्यावर सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीरपणे पॉर्नोग्राफी कंटेंट पसरवल्याचा आरोप आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांच्या ठिकाणांवरील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. जेणेकरून या गुन्ह्याच्या सखोल तपास करता येईल.
(नक्की वाचा: काय आहे 2.0 पॅन कार्ड ? जुनं पॅन कार्ड-ई पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?)
पॉर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रा यांचे नाव यापूर्वीच चर्चेत आले होते. राज कुंद्रांना 2021'अश्लील' चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. कुंद्रा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर ते सध्या सप्टेंबर 2021 पासून जामिनावर आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचेही नाव पुढे आले होते, मात्र आतापर्यंत तिच्यावर या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला नाही.
(नक्की वाचा- बॉयफ्रेंडचे राक्षसी कृत्य! प्रेयसीवर अत्याचार अन् हत्या; 40 तुकडे करुन जंगलात फेकले)
राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात पोर्नोग्राफी प्रकरणी ईडीने टाकलेल्या या छाप्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनेक मोठे खुलासे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या ईडीची टीम सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत आहे.