झारखंड: दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्याकांडापेक्षाही भयंकर घटना झारखंडमध्ये घडली आहे. झारखंडच्या खुंटी जिल्ह्यामध्ये एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे 40- 50 तुकडे करुन जंगलात फेकून दिले. नरेश भेंगरा असे या नराधम आरोपीचे नाव असून 15 दिवसांनी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नराधम आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नरेश भेंगरा गेल्या काही वर्षांपासून तामिळनाडूतील एका २४ वर्षीय महिलेसोबत 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही काळापूर्वी तो झारखंडला परतला आणि आपल्या प्रेयसीला न सांगता त्याने दुसरे लग्न केले आणि पत्नीला सोबत न घेता झारखंडमध्ये राज्यात परत गेला. आरोपीने दुसरे लग्न केले होते आणि पीडितेला त्याच्या घरी घेऊन जायचे नव्हते.
नक्की वाचा: संसदेच्या अधिवेशनात 'इंडी' आघाडी अडचणीत, TMC कडून काँग्रेसची खरडपट्टी
दुसरीकडे महिलेला त्याच्या लग्नाची माहिती नव्हती, म्हणून तिने त्याच्यावर परत येण्याचा आग्रह केला. यामुळेच त्याने तिचा काटा काढायचे ठरवले. खुंटी येथे 8 नोव्हेंबर रोजी त्याने जरियागड पोलीस ठाण्याच्या जोर्दग गावात घराजवळील जंगलात नेले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. इतकेच नव्हेतर तिच्या मृतदेहाचे तुकडेही केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीतेला खुंटी येथील त्याच्या घराजवळ एका ऑटोरिक्षात नेले आणि तिला थांबायला सांगितले. धारदार शस्त्र घेऊन परत आला आणि तिच्यावर बलात्कार केल्यानंतर स्कार्फने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मृतदेहाचे 40 ते 50 तुकडे केले आणि ते जंगलात फेकून दिले. या क्रुरकृत्यानंतर तो काहीच घडले नसल्यासारखा पत्नीसोबत राहण्यासाठी घरी गेला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही धक्कादायक घटना खुनाच्या 15 दिवसांनंतर 24 नोव्हेंबर रोजी उजेडात आली, जेव्हा जरीगढ पोलीस स्टेशन हद्दीतील जोरदग गावाजवळ एक भटका कुत्रा मानवी शरिराचे तुकडे घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. मृतदेह सापडल्यानंतर जंगलात मृत महिलेचे सामान असलेली बॅगही सापडली असून त्यात तिचे आधार कार्डही होते. महिलेच्या आईला घटनास्थळी बोलावून तिच्या मुलीच्या सामानाची ओळख पटवली.
महत्वाची बातमी: शिंदेंच्या आमदाराचा पराभव , आता थेट राजकीय निवृत्तीबाबत विधान, नक्की काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world