Mumbai News : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार; काय आहे निमित्त?

Mumbai News: आदित्य ठाकरे यांना स्थानिक आमदार म्हणून निमंत्रण असले तरी, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : वरळीतील बहुचर्चित बीडीडी चाळीच्या (BDD Chawl) पुनर्विकास प्रकल्पातील (Redevelopment Project) पहिल्या टप्प्यातील 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या (Keys) वाटपाचा कार्यक्रम 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाचे निमंत्रण आणि व्यासपीठ नियोजनामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे म्हाडाच्या (MHADA) वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रमुख उल्लेख आहे. याशिवाय, वरळीचे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार म्हणून अरविंद सावंत यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण असणार आहे.

( नक्की वाचा : Raju Patil : 15 ऑगस्टला 'मॅकडोनाल्ड, KFC बंद करणार का?'राजू पाटील यांचा KDMC ला संतप्त सवाल )

श्रेयवादाची लढाई

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. या प्रकल्पाचे काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सुरू झाले होते आणि त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यावरही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते सुरू राहिले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नक्कीच या प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून राजकीय लढाई पाहायला मिळेल.

(नक्की वाचा-  Pune News: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना AI च्या मदतीने धडा शिकवणार; पुणे पोलिसांचा अभिनव प्रयोग)

आदित्य ठारे यांना स्थानिक आमदार म्हणून निमंत्रण असले तरी, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे. जर ते उपस्थित राहिले, तर महायुतीचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील, ज्यामुळे एक वेगळाच राजकीय संदेश जाईल. दुसरीकडे, जर त्यांनी दांडी मारली, तर भाजप-शिंदे गट श्रेयवादाच्या या लढाईत बाजी मारल्याचा दावा करू शकतात.

Advertisement

एकूणच, 14 ऑगस्ट रोजी होणारा हा कार्यक्रम केवळ चाव्यांच्या वाटपापुरता मर्यादित न राहता, राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

Topics mentioned in this article