Eknath Shinde Exclusive: "आम्ही तोडणारे नाही जोडणारे आहोत!" 'ऑपरेशन टायगर'वर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

'ऑपरेशन टायगर'नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटीव्ही मराठीला Exclusive मुलाखत दिली. "आम्ही तोडणारे नाही तर जोडणारे आहोत," असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

DCM Eknath Shinde Exclusive: राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या 'ऑपरेशन टायगर'नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली विशेष मुलाखत NDTV मराठीला दिली. विरोधी पक्षातील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात (शिवसेना) प्रवेश करत असल्याच्या पार्श्वभूमीवर, "हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न नसून कार्यकर्त्यांचा आमच्यावर असलेला विश्वास आहे," असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

'ऑपरेशन टायगर'ला फुलस्टॉप आहे का? 

मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, "आम्ही कुठलाही पक्ष फोडण्यासाठी जात नाही. आज आमदार, खासदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्यासोबत का येत आहेत, याचा विचार त्यांनी (उद्धव ठाकरे) करण्याची गरज आहे. जे लोक त्यांच्याकडून आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करत आहोत. मात्र ते पक्ष का सोडत आहेत, यावर त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे."

Advertisement

ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "जेव्हा हे लोक त्यांच्याकडे असतात तेव्हा चांगले असतात, पण आमच्याकडे आले की लगेच वाईट होतात, त्यांच्यावर गंभीर आरोप केले जातात आणि शिव्याशाप दिले जातात."

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

उद्धव ठाकरेंवर निशाणा

2022 मधील राजकीय भूकंपाची आठवण करून देत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा पुनरुच्चार केला. "आम्ही 2022 मध्ये जेव्हा उठाव केला, तेव्हा सत्ता आणि मंत्रीपदावर पाणी सोडून बाहेर पडलो. कारण त्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडले होते. बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, पण ते त्याच काँग्रेससोबत गेले", अशी आठवण करून देताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

"ते तुडवणारे, आम्ही वाढवणारे"

"महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या भूमिकेला स्वीकारले. म्हणूनच आमचे 40 आमदारांचे आज 60 आमदार झाले आहेत. आम्ही पक्ष तोडणारे नाही, तर जोडणारे आहोत. ते तुडवण्याची भाषा करतात, ते तुडवणारे आहेत आणि आम्ही पक्ष व महाराष्ट्र वाढवणारे आहोत, हाच आमच्यातील आणि त्यांच्यातील मुख्य फरक आहे."

(नक्की वाचा-  Malshej Ghat: माळशेज घाटात रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद! काय आहेत पर्यायी मार्ग?)

आमदार, खासदार शिवसेनेत का येतात? 

जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे थेट जनतेला उत्तरदायी असतात. त्यांना आपल्या भागातील विकासकामे करायची असतात आणि त्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीर पक्ष उभा असणे गरजेचे असते. अशा वेळी जर माझ्यावर विश्वास ठेवून कोणी कर्तव्यभावनेतून आमच्यासोबत येत असेल, तर मी नक्कीच त्यांचे स्वागत करेन," अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 


Topics mentioned in this article