अमजद खान, प्रतिनिधी
Ulhasnagar Municipal Corporation latest News : उल्हासनगर महापालिकेत 40 नगरसेवकांचा गट स्थापन करत शिवसेना शिंदे गटाने मॅजिक फिगरचा आकडा गाठला आहे. त्यामुळे उल्हानगर महापालिकेत बहुमतासाठी शिंदे गटाला भाजपची आवश्यकता नाही.परंतु,सत्तेत भाजपला सोबत घेणार आणि महायुतीची सत्ता येणार, असं खासदार श्रीकांत शिंदे यांचं म्हणणं असल्याची माहिती कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि मनसेची युती झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच,दुसरीकडे उल्हासनगमध्ये शिंदे गटाने भाजपचा गेम केलाय.उल्हासनगरमध्ये एकूण 78 जागा आहेत. शिवसेनेचे आणि भाजपचे एकूण 37 नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसला 1,वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि साई पक्षाचा 1 नगरसेवक निवडून आला. उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 40 जागांचं बहुमत गरजेचं आहे. शिंदे गटाने हा बहुमताचा आकडा गाठला आहे.
नक्की वाचा >> रायगड मुख्यालयातील यंदाचा ध्वजारोहणाचा मान कोणाला? आदिती तटकरे की भरत गोगावले? शासनाने काढलं परिपत्रक
एक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार
शिंदे गटाने 40 नगरसेवकांचा गट स्थापन करत अरुण आशाण यांची गटनेतेपदी निवड केली आहे.शिवसेनेचे 37, वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि साई पक्षाचा 1 गट तयार करण्यात आला आहे. तर काँग्रेसचा एक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार आहे.त्यामुळे आता शिंदे गटाला भाजपच्या जागांची गरज नाहीय. पण उल्हासनगरात महायुतीची सत्ता बसेल, असं श्रीकांत शिंदेंचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईतील प्रसिद्ध महिला नगरसेवक शिंदें गटाच्या गळाला, सेना भवनात काय घडलं?
मुख्यमंत्र्यांनी ओमी कलानींना दिला होता इशारा
उल्हासनगर मध्ये शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीत रिंगणात होते. दोघांसाठी वर्चस्वाची लढाई होती. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपासाठी जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगर मध्ये मोठी सभा घेतली. "उल्हासनगर मध्ये गुंडगिरी चालणार नाही. या ठिकाणी कायद्याचं राज चालणार', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ओमी कलानी यांना इशारा दिला होता. आता शिवसेनेने मॅजिक फिगर गाठली आहे. तरीपण भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या नेते औपचारिकपणे सांगत आहेत. मात्र भाजप काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world