- संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Ashadhi Wari 2026: आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त विठु माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची पाण्याचा प्रश्न भेडसावू नये, यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. 'अल निनो'च्या संकटामुळे भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यावर काही निर्बंध असले, तरी वारकऱ्यांच्या स्नानासाठी आणि सुविधेसाठी चंद्रभागा (भीमा) नदीत पाणी सोडण्याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याची महत्त्वाची माहिती ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. पंढरपूर येथील आषाढी वारीच्या पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
(नक्की वाचा: Pandharpur News : यंदाच्या आषाढी वारीत 'तुकाराम मुंढे पॅटर्न' दिसणार; वारकऱ्यांची चिंता मिटली!)
पालखी मार्गावर पाण्याची कमतरता भासणार नाही
यंदा पावसाचे प्रमाण आणि अल निनोचा प्रभाव लक्षात घेता प्रशासनाकडून पाण्याचे काटेकोर नियोजन केले जात आहे. "राज्यात काही ठिकाणी पाणीटंचाईचे सावट असले तरी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी पाण्याचा कोणताही तुटवडा भासणार नाही" अशी ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर विकास आराखड्यासाठी तब्बल ₹३,९९३.९० कोटींच्या निधीला राज्य शासनाची मंजुरी!
— Jaykumar Gore (@Jaykumar_Gore) June 28, 2026
आज नियोजन भवन, सोलापूर येथे आयोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर विकास आराखडा जिल्हास्तरीय समितीची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत… pic.twitter.com/Ptbgf8kDUc
(नक्की वाचा: Ashadhi Wari 2026: 10 जुलैपासून पंढरपुरात मोठा बदल, विठुरायाच्या दर्शनाबाबत 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय लागू)
65 एकर परिसर आणि चंद्रभागा वाळवंटाची पाहणी
आषाढी वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी (28 जून) पंढरपुरात येऊन पालखी मार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट परिसर, विठ्ठल मंदिर परिसरासह 65 एकर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठेही उणीव राहू नये, यासाठी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत जागच्या जागी चर्चा करून सूचना दिल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world