- जर्मनीतील महिला भारतात देव शोधण्यासाठी आली आणि पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाशी जोडली गेली
- ती गेल्या पस्तीस वर्षांपासून चेन्नईत राहते तिने वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला
- २००७ पासून ती वारकरी संप्रदायातील अभंगांचे अर्थ समजून घेऊन वारीला नियमित हजेरी लावते
मयुर बोरसे
एक परदेशी महिला भारतात आली अन् पुढे भारतातची झाली. त्यामागे कारण होतं देवाची भक्ती. ती देव शोधण्यासाठी भारतात आली होती. देव, साधू, संत, योगी यांना शोध ती आली होती. पुढे तिने भारतीय व्यक्तीशीच लग्न केलं आणि भारतीय झाली. त्यावेळी तिला विठ्ठलाबद्दल समजलं. तिने संशोधन केलं. पहिल्यांदा पंढरपूरला आली त्यानंतर ती नियमित वारकरी झाली. ही गोष्ट आहे एका जर्मन महिलेची. पांडूरंगाची भक्त झाली असून ती नियमित वारीला हजेरी लावते. यावेळी तिने वारीची महत्व सांगितले आहे.
या महिलेने NDTV मराठी सोबत बातचीत केली. त्यावेळी बोलताना तिने सांगितले की मी मुळची जर्मनीची आहे. माझे आई-वडील जर्मनीचे आहेत. लहानपणा पासून मला भारताचे आकर्षण होते. तिथले शिक्षण झाल्यानंतर पुढच्या संशोधनासाठी आपण भारतात आलो असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर भारतीय व्यक्तीसोबतच लग्न केलं. लग्नानंतर जर्मनीत जाणं येणं होतं. पण 2009 नंतर जर्मनीत गेली नाही. गेल्या 35 वर्षापासून चेन्नईत राहत आहे. आपले पती भरतनाट्यमचे कलाकार आहेत. त्यामुळे नेहमी विठ्ठल नामाचा संबंध येत होता. त्यावेळी विठ्ठलाचा शोध घेण्याचं ठरवलं. संशोधन केलं. त्यावेळी पंढरपूर हे नाव आपल्या समोर आलं.
2009 पासून कुठे जात असेल तर पंढरपूरलाच जात असल्याचं त्यांनी सांगितले. 2007 पासून पंढरपूरची वारी करत आहे. चेन्नईत ज्या वेळी विठ्ठलाचं नाव ऐकलं त्यावेळीच आपण विठ्ठलाचे भक्त झालो. चेन्नईत पांडूरंग मेळावा होतो. तिकडे विठ्ठल मंदिरं ही आहेत. पण मला त्याबाबत माहित नव्हते. रिसर्च केल्यानंतर काही गोष्टी समजल्या. त्यानंतर वारकरी संप्रदायाचाही अभ्यास केला. संत परंपरा जाणून घेतली. त्यानंतर पांडूरंग आणि वारकरी संप्रदायाची मी भक्त झाले असं त्यांनी सांगितलं. अभंग वाचले. ते समजून घेतले. ते मराठीत होते त्याचा अर्थ समजवून घेतला. काही इंग्रजीत ही अनुवादीत केले असं त्यांनी सांगितलं. आता आपण अभंगही बोलतो. त्यात काही अडचण येत नाही.
तुकाराम महाराज, नामदेव महारांजांचे अभंग इंग्रजी अनुवादीत केले आहेत. वेद ही वाचले आहेत असं त्यांनी सांगितलं. भाव महत्वाचा आहे. तो आपल्याला वारीत आल्यानंतर समजतो. अभंगाचं रिसर्च केला. अभ्यास केला. त्यावेळी वारकऱ्यांनी मदत केली असं ही त्या म्हणाल्या. 2007 साली पहिल्यांदा पंढरपूरला आली. त्यावेळी वाटलं होतं फक्त दर्शन होणार आणि आपण परतणार. पण इथलं चित्र फार वेगळं होतं. पहिलाच अनुभव छान होता. हा एकतेचा सोहळा असल्याचं जाणवलं. इथं कोणी उच्चनिच नाही. सर्व समान आहेत. वारीत सर्व जण एकत्र राहतात. त्यामुळे वारी किती महान आहे हे समजले. त्यामुळेच पुढचा जन्म जर घेतला तर तो वारकऱ्याच्या घरात व्हावा अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world