जाहिरात

Pune News : एस्केलेटरवरून पडून वृद्धाचा मृत्यू, पुणे रेल्वे स्थानकातील घटना

Pune News : अशोक देशपांडे हे आपल्या कुटुंबीयांसोबत आले होते. ते सर्व जण पुण्याहून नागपूरला निघाले होते. अशोक देशपांडे हे पत्नी, मुलगी आणि नातवंडांच्या पुढे सामान घेऊन चालले होते.

Pune News : एस्केलेटरवरून पडून वृद्धाचा मृत्यू, पुणे रेल्वे स्थानकातील घटना

राहुल कुलकर्णी, पुणे

Pune News : पुणे रेल्वे स्थानकाता एस्केलेटरवरून पडून एका 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशोक प्रभाकर देशपांडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अशोक देशपांडे हे आपल्या कुटुंबीयांसोबत आले होते. ते सर्व जण पुण्याहून नागपूरला निघाले होते. अशोक देशपांडे हे पत्नी, मुलगी आणि नातवंडांच्या पुढे सामान घेऊन चालले होते. एस्केलेटरवर म्हणजेच फिरत्या जिन्यावर चढताच त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत ते जिन्यावरच पडून होते. मात्र कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. सर्वजण बघ्याची भूमिका घेत होते.

(नक्की वाचा- "परतफेड करेन तेव्हा डिलिट करणार", नितशे राणेंना 'तो' व्हिडीओ आजही मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय)

देशपांडे यांच्या पत्नी संध्या यांनी या घटनेबाबत सांगितलं की, घटना घडली त्यावेळी तिथे कुणीच नव्हते. कुणीही आम्हाला मदत केली नाही. मी ओरडले, किंचाळले, माझा आवाज स्टेशनवर घुमला, पण रेल्वे कर्मचारी किंवा पोलीस मदतीला आले नाहीत. दोन अनोळखी व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर दोन रेल्वे पोलीस आले.

(नक्की वाचा - Income Tax विभागाचा अजब कारभार? मजूराला पाठवी 314 कोटींची नोटीस, पुढे काय झालं?)

गंभीर जखमी अवस्थेत अशोक यांना प्रथम ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. 9 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा अखेर रुग्णालयात मृत्यू झाला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: