डॉल्बी आणि लेझर लाइटमुळे होणारे धोके लक्षात येता राज्यातील अनेक भागात पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. हा सर्व प्रकार नागरिकांसाठी धोकादायक असल्याचं यापूर्वीही पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र गणपती मंडळांनी याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. यातूनच कोल्हापुरातील एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला.
कोल्हापुरात गणपती मिरवणुकीतील डॉल्बीच्या दणदणाटात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उचगाव या गावातील सार्वजनिक गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ही घटना घडली. शिवाजी कासोटे असं मृत व्यक्तीचं नाव असून डॉल्बीच्या दणदणाटामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं. त्यांना डॉल्बीच्या आवाजाने त्रास झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Khuni Ganpati : मौलानाच्या आरतीशिवाय होत नाही विसर्जन; काय आहे धुळ्यातील 'खुनी गणपती'चा इतिहास?
मिळालेल्या माहितीनुसार, गणपती मिरवणूक पाहून आल्यानंतर छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते दोन दिवसांपासून आजारी होते. त्यात डॉल्बीच्या आवाजाने त्यांचा त्रास वाढला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
नक्की वाचा - सांगलीतील गावात मशिदीत बाप्पा विराजमान, या प्रथेचं अन् पुण्याच्या पानशेत धरणाचं आहे कनेक्शन
तब्बल 28 मंडळाच्या डॉल्बी आणि एलईडी लाईटमध्ये गणपती बाप्पाची मिरवणूक सुरू होती. त्यातून मृत्यू ओढावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने आवाज वाढवणाऱ्या डॉल्बीवर अद्याप तरी कोणतीही कारवाई केलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world