नाशिकच्या येवला तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. आकाशातून एक इलेक्ट्रिल उपकरण पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंदरसुल शिवारात बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास डॉ.हरीश रोकडे यांच्या शेतात लाल रंगाचा प्रकाश व मोठा आवाज येत असलेली वस्तू आढळून आली. वस्तू आकाशात कोसळल्याचे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली.
नागरिकांना जवळ जाऊन तपासणी केली असता कोरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपकरण असल्याचे निदर्शनास आले. यंत्र कोसळल्यानंतर हा आवाज बंद झाल्याने शेतकऱ्यांनी जवळ जाऊन पाहताच सदर यंत्रावर कोरियन भाषेमध्ये काहीतरी मजकूर लिहिल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे यंत्र हे कोरियाचे असल्याचे समोर येत आहे.
या घटनेची माहिती मिळतात तहसीलदार आबा महाजन, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, तलाठी कमलेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान अज्ञात वस्तू कोसळल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून ,नेमकी काय वस्तू असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.