किशोर बेलसरे, नाशिक
नाशिकच्या गिरनारे गावातील एका सॉफ्टवेअर इंजिनियरने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली, याप्रकरणी मयत युवकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये पत्नी,सासू, सासरे, मेव्हणा, मावस मामा, मामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल गणपत थेटे (वय 31) असे मयत असलेल्या युवकाचे नाव असून, त्याने आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहिली आणि व्हिडिओ देखील शूट केला आहे. त्यामध्ये संशयीतांची नावे घेत आरोप केल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिक तालुक्यातील गिरणारे गावात राहणाऱ्या फिर्यादी 55 वयीन सरिता गणपत थेटे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची दोन्ही मुले इंजिनिअर असून राहुल हा धाकटा मुलगा होता.
(नक्की वाचा- Shocking! पतीचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत; खाली पत्नी पुजा-अर्चा करण्यात लीन)
राहुलच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, 2021 साली त्याचा विवाह भगूर विजयनगर येथील पल्लवी नंदू हारक हिच्या सोबत झाला होता. लग्नानंतर दोन-तीन महिने त्यांचा संसार सुखाने चालला होता. पल्लवीकडून राहुलला तसेच मला शिवीगाळ केली जाऊ लागली. तसेच ती राहुलला मारहाण देखील करत होती. माहेरी निघून जात होती. सासू-सासरे अन्य नातेवाईकांनी सुद्धा त्याला धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Pune Crime : मुलींसमोरच वडिलांची निर्घृण हत्या, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला घात)
रविवारी पल्लवी- राहुल यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यावेळी पल्लवीने त्याला मारहाण देखील केली आणि स्वयंपाकही केला नव्हता, अशी माहिती राहुलच्या आईने दिली. या फिर्यादीवरून राहुलची पत्नी पल्लवी, सासरे नंदू हारक, सासू अनिता नंदू हरक, मेव्हणा अंकेश हरक, मावस मामा रामदास धांडे, मावस मामी माधुरी धांडे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तालुका पोलीस स्टेशन करत आहेत.
राहुल हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून राहुलने आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी, मोबाईलमध्ये काढलेला व्हिडिओ व त्याच्या मोबाईलमध्ये असलेले मारहाणीचे व्हिडिओ हे सर्व पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून तालुका पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. चिठ्ठीत देखील मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.