जाहिरात

Kalyan News: विद्यार्थ्यांनो अलर्ट राहा, कल्याणमध्ये JEE परीक्षा केंद्रावर एका तरुणीला प्रवेश नाकारला, कारण..

कल्याणमध्ये जेईईची परिक्षा देण्यासाठी परिक्षा केंद्रावर आर.एन.नेत्रा ही तरुणी पोहचली.मात्र तिला आधार कार्डचे कारण देत तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला.

Kalyan News: विद्यार्थ्यांनो अलर्ट राहा, कल्याणमध्ये JEE परीक्षा केंद्रावर एका तरुणीला प्रवेश नाकारला, कारण..
Kalyan JEE Exam Center News Today
मुंबई:

Kalyan JEE Exam Center News : कल्याणमध्ये जेईईची परिक्षा देण्यासाठी परिक्षा केंद्रावर आर.एन.नेत्रा ही तरुणी पोहचली.मात्र तिला आधार कार्डचे कारण देत तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे तिला परीक्षेला बसता आलं नाही. तिच्या आईसह अन्य पालकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.आर.एन.नेत्रा असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. तिला परीक्षा देता न आल्याने तिचं मोठं नुकसान होणार आहे. तिचे झालेले शैक्षणिक नुकसान कोण भरुन देणार? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे.ती परिक्षा केंद्रावर वेळेवर पोहचू शकली नाही, त्यामुळे तिला परिक्षा केंद्राच्या आत घेतले नाही, असं स्पष्टीकरण परिक्षा केंद्र प्रमुखांनी दिलं आहे. 

कल्याण पूर्वेतील कमलादेवी विद्यालय या शाळेत जेईईचे परिक्षा केंद्र होते.ही परिक्षा देण्यासाठी नेत्रा सकाळी ८ वाजताच पोहचली.मात्र तिला केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी त्याठिकाणी सुरक्षा रक्षकांसह केंद्र अधिकारी वर्गाने कागदपत्रांची मागणी केली. तिच्याकडे आधारकार्ड मागण्यात आले.तिच्याकडे मूळ आधार कार्ड नव्हते.तिच्याकडे मूळ आधार कार्डाची छायांकित प्रत मागण्यात आली.तिने तिच्या आजीला बोलावून घेतले.तिला छायांकित प्रत आण्यासाठी पाठविले.आजी छायांकित प्रत घेऊन आली. मात्र परिक्षा केंद्रावरील प्रमुखांनी वेळ संपल्याचे सांगत तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला.

नक्की वाचा >>Kalyan News: कल्याणच्या गांधारी रिंग रोडवर गाड्यांची थरारक रेसिंग, नागरिकांचा जीव धोक्यात, व्हिडीओ व्हायरल

परिक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची मागणी

आर.एन.नेत्राने सांगितले की,मी परिक्षा केंद्रावर वेळेवर पोहचली होती.तिच्याकडे आधार कार्डची छायांकित प्रत मागितली.ती देखील तिने दिली.तरी देखील मला परिक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही.मी वेळेवर आलेले नसेल तर परिक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज तपासावेत.या बाबत पोलिसांकडे मदतही मागितली.मात्र पोलिसांनी दाद दिली नाही.आर.एन.नेत्राच्या आईने सांगितले की,माझ्या मुलीला जाणीवपूर्व शुल्लक कारणावरुन प्रवेश नाकारला गेला आहे.

त्यामुळे तिची परिक्षा हुकली आहे.ठाण्याहून आलेले रवी मोरे हे त्यांच्या मुलीला परिक्षेसाठी कल्याणला घेऊन आले होते.त्यांनी सांगितले नेत्राला  जाणीवपूर्व प्रवेश नाकारला.ती मुलगी केंद्रावर वेळेत पोहचली होती.तिला हुसकावून लावण्यात आले.ही अत्यंत चुकीची बाब आहे.अन्य एक पालक आरती रावत हिने सांगितले की,नेत्रासोबत घतलेला प्रकार अत्यंत वाईट आहे.तिचे वर्ष वाया जाणार आहे. तिचे शैक्षणिक नुकसान झाले त्याला जबाबदार कोण?असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com