Kalyan Bike Racing Viral Video : कल्याणमधील गांधारी रिंग रोड हा मृत्यूचा सापळा बनलाय. स्टंटबाज वाहन चालक संध्याकाळच्या सुमारास भरधाव वेगाने या रोडवरून गाड्या चालवतात. तर कधी कधी हे चालक धोकादायक रेसिंगही लावतात. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांसह, इव्हिनिंग वॉक, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच तरुणांच्या दुचाकीच्या स्टंटबाजीच्या व्हिडीओमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्टंटबाज तरुणांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांकडून तात्पुरत्या उपाययोजना राबवल्या जातात. परंतु, अजूनही या रोडवर जीवघेण्या स्टंटबाजीचा थरार सुरूच असल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. कल्याण गांधारी रिंग रोडवरील पुलावर धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, 'या' पिकांचं होणार मोठं नुकसान, कारण काय?
रिंग रोडवर सायकलिंग करणाऱ्या एका व्यावसायिकाचा मृत्यू
काल गुरुवारी रात्रीच्या वेळी काही तरुणांनी बाईकवरून स्टंटबाजी केल्याचं व्हिडीओत कैद झालं आहे. पोलिसांकडून अशा चालकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. रिंग रोडवर सायकलिंग करताना कल्याणमधील नामांकित व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता. एका अल्पवयीन कार चालकाने तांदळे यांना पाठीमागून धडक दिली होती. या अपघातात ते गंभीरित्या जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
— Naresh Shende (@NareshShen87640) April 3, 2026
नक्की वाचा >> Mumbai News: 40 वर्षांपासून CSMT स्टेशनवर मागितली भीख, मुंबईचा हा व्यक्ती बनला जगातील सर्वात श्रीमंत भिकारी
इथे पाहा बाईक रेसिंगचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
कल्याणच्या या नामांकित व्यवसायिकाच्या मृत्यूनंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन चालक आणि त्याच्या आईवर कारवाई केली. रिंग रोडवर बॅरिकेटिंगही करण्यात आलं.तरीही दुचाकीस्वार स्टंटबाजी करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या स्टंटबाजी करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिला नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
डॉक्टर सोनाली पाटील यांचे म्हणणे आहे की, पालकांनी त्याची मुले नक्की काय करतात हे पाहिले पाहिजे. अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या कशाला देतात .आपला मुलगा काय करतो. तो गाडी कशा प्रकारे चालवितो. तो स्टंटबाजी करतो हे कोण पाहणार पोलिस आणि संबंधितांनी ही स्टंटबाजी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजे. नियम देखील बदलले पाहिजेत. त्यामुळे स्टंटबाजीला आळा बसेल हे पाहिले पाहिजे.
कल्याण सायकलिस्ट ग्रुपचे पदाधिकारी डॉक्टर रेहनुमा आयते शामुद्दीन यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या सायलिकस्ट मित्राचा स्टंटबाजीमुळे मृत्यू झाला. आम्ही पोलिस, महापालिका यांना पत्र व्यवहार केला. पोलिसांनी काही पावले उचलली. मात्र पुन्हा त्याठिकाठी स्टंटबाजी केली जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि सगळ्यातसाठी घातक बाब आहे. आत्ता पोलिस स्टंटबाजांना कशा प्रकारे धडा शिकवितात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world