जाहिरात

Maharashtra Electric Bike Taxi Fare: दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित,जाणून घ्या किमान अन् कमाल भाडे

मुंबई महानगर क्षेत्रात प्रायोगिकरित्या ही सेवा सुरू होणार आहे.

Maharashtra Electric Bike Taxi Fare: दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित,जाणून घ्या किमान अन् कमाल भाडे
मुंबई:

Maharashtra E Bike Taxi Fare: राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने  महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम 2025 अंतर्गत हे भाडेदर निश्चित केले आहेत. सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही भाडेदर निश्चिती तात्काळ लागू होणार आहे. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर ₹ 10.27 प्रमाणे प्रवासी भाडे आकारले जाईल. याशिवाय पहिला टप्पा 1.5 किमीचा असेल.  प्राथमिक भाडे ₹ 15/- इतके  अनिवार्य असेल. म्हणजेच प्रवास कितीही छोटा असो, किमान ₹15 आकारले जाणार असून, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला ₹10.27 प्रमाणे दर लागू होईल.

नक्की वाचा - Pune News: स्वारगेट बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट, अन् कारवाईचा इशाराही थेट

राज्य परिवहन प्राधिकरणाने तीन प्रमुख कंपन्यांना मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., मे. रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि., व मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. तात्पुरता “मुंबई महानगर क्षेत्रासाठी प्राव्हिजनल लायसन्स” मंजूर केलं आहे. या परवान्याची मुदत 30 दिवसांची असून, त्यानंतर अंतिम लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी-शर्ती मान्य करूनच कंपन्यांना पुढील परवाना देण्यात येईल असं सरकार तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

नक्की वाचा - Pune News: 'सासऱ्याशी शरीर संबंध ठेव', पती अन् सासूचा सुनेवर दबाव, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात भयंकर कांड

या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.  प्रदूषणाला आळा बसण्यास यातून मदत होईल, असा विश्वास राज्य परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. जनतेच्या सोयीसाठीच ही सेवा सुरू केली जात आहे. सरकारनेही त्याला आता मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातल्या जनतेचा त्याचा थेट फायदा होणार आहे. 

भाडे पुढील प्रमाणे 

  • किमान भाडे – ₹15/-
  • त्यानंतर प्रति किलोमीटर दर – ₹10.27/-
  • सध्या उबेर, रॅपिडो व अॅनी टेक्नॉलॉजीज या कंपन्यांना परवाना
  • मुंबई महानगर क्षेत्रात प्रायोगिकरित्या सेवा सुरू होणार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com