मोसिन शेख, प्रतिनिधी
Bullock Cart Viral Video : पेट्रोल संपणार अशा अफवांमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागत आहे.लोकांनी क्षमतेपेक्षा जास्त पेट्रोल खरेदी सुरू केल्याने अनेक पेट्रोल पंप अक्षरशः बंद पडली आहे. मात्र,कन्नड तालुक्यातील शिवराई फाटा येथे जे घडलं,ते पाहून प्रशासन आणि सामान्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन पडलं आहे. एका तरुणाची दुचाकी रस्त्यातच 'ड्राय'झाली.दुचाकी ढकलत नेण्यापेक्षा किंवा तासंतास रांगेत उभं राहण्यापेक्षा या तरुणाने थेट बैलगाडीची मदत घेतली. दुचाकी बैलगाडीत ठेवत हा पठ्ठ्या पेट्रोल पंपावर पोहोचला आणि दुचाकीत पेट्रोल भरलं. त्याचा कारनामा पाहून पेट्रोल पंप चालकांना देखील धक्का बसला.
पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक झळकले
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक झळकत आहेत. शिवराई फाट्यावरील या घटनेवरून एका अफवेमुळे पेट्रोल प्रश्न किती गंभीर झाला आहे हे दिसून येत आहे.ज्या दुचाकीला वेगाचं प्रतीक मानलं जातं.तीच दुचाकी आज बैलगाडीवर मान टाकून पडलेली पाहायला मिळाली.इंधनाअभावी आधुनिक वाहतूक व्यवस्था कशी कोलमडून पडली आहे आणि माणूस पुन्हा जुन्या साधनांकडे वळण्यास कसा मजबूर झाला आहे.याचे हे विदारक चित्र आहे.
नक्की वाचा >> Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ, 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू, प्रकरण काय?
बैलगाडीचा व्हिडीओ व्हायरल
— Naresh Shende (@NareshShen87640) March 27, 2026
बैलगाडीतून दुचाकी नेण्याचा हा 'जुगाड' पाहून रस्त्यावरील लोकही अवाक झाले. काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे."अच्छे दिन आले का?"असा खोचक सवाल नेटकरी विचारत आहेत.एका बाजूला तंत्रज्ञानाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला पेट्रोलसाठी तरुणाला बैलगाडी वापरावी लागणे,याची देखील चर्चा होत आहे.
नक्की वाचा >> Pune News : 5 लाख विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित, सावित्रीबाई फुले विद्यापीठात काय घडलंय? विद्यार्थी रस्त्यावर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world