Chhatrapati Sambhajinagar : आधी सरण रचलं मग स्वत:ला पेटवलं; शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बाबासाहेब मागील महिनाभरापासून पळसगाव येथील घरी एकटेच राहत होते. त्यांची आई, पत्नी मुलगी आणि मुलगा पुण्यात राहायला गेले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचत अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथे उघडकीस आली आहे. बाबासाहेब दशरथ भोसले असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. बाबासाहेब भोसले हे शेतात एकटेच राहत होते. तर त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत माहिती मिळू शकली नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बाबासाहेब मागील महिनाभरापासून पळसगाव येथील घरी एकटेच राहत होते. त्यांची आई, पत्नी मुलगी आणि मुलगा पुण्यात राहायला गेले होते. त्यामुळे घटना घडली त्यादिवशी घरी कुणीही नव्हते. 

Advertisement

नक्की वाचा - Navi Mumbai News: इंग्लंडहून महागडे गिफ्ट पाठवलं, एक फोन अन् महिलेच्या खात्यातून 50 लाख फुर्रर्रर्रssss

रविवारी दुपारी बाबासाहेब भोसले यांनी शेतात स्वत: लाकडं गोळा करून सरण रचलं. त्यानंतर अंगावर आणि सरणांवर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. मात्र काही वेळात त्यांनी सरणावरून बाजूला उडी घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रेंडिंग बातमी - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेनचा 9 जूनपासून शुभारंभ! सहल-यात्रा आणि खर्चाचा तपशील वाचा एका क्लिकवर

काही वेळातच त्यांचं मोठ्या प्रमाणात होरपळलं होतं. स्थानिकांना काही वेळांने घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना याबाबत पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवसा आहे. मात्र बाळासाहेब यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Topics mentioned in this article