जाहिरात

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहावं लागणार

Pune Porsche Car Accident : विशाल अगरवालला जस्टीस जुव्हेनाईल अॅक्टच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. परंतु त्याला आता पुणे सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केली आहे.

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहावं लागणार

राहुल कुलकर्णी, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे. मात्र इतर दोन गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. त्यामुळे विशाल अग्रवालचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विशाल अग्रवालला जस्टीस जुव्हेनाईल अॅक्टच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. परंतु त्याला आता पुणे सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केली आहे. मुलगा अल्पवयीन आहे आणि दारूच्या नशेत आहे, याची माहिती असताना सुद्धा त्याला गाडी दिल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात विशाल अग्रवालला जामीन देण्यात आला आहे.

(नक्की वाचा- पुणे पोर्शे अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी 'रक्त' देणाऱ्या आईला अटक)

काय आहे प्रकरण? 

पोर्शे कारनं दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. कार चालवणारा अल्पवयीन होता. रात्रभर पबमध्ये बसून दारु प्यायल्यानंतर कार अनियंत्रित होऊन हा अपघात झाला होता. या प्रकरणात त्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक करण्यात आली होती. विशाल अग्रवाल यांनी विविध कट रचत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपासात याप्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा देखील याता हात असल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे.

Exclusive : 'त्या' निकालातील मोठी चूक पोलिसांनी पकडली, पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट )

अग्रवाल कुटुंबातील 4 जण तुरुंगात

कार दुर्घटनेनंतर पुणे प्रकरणी वेगाने कारवाई करत यामध्ये ज्या कुणाचा सहभाग होता त्या सर्वांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना अल्पवयीन मुलगा, त्याचे आई-वडील, आजोबा यांना देखील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक केली आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या 3 कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'सांगली पॅटर्न'ची आठवण करुन द्या, शिवसेनेच्या आक्रमकतेला आवर घालण्यासाठी काँग्रेस हायकमांडचे आदेश?
पुणे पोर्शे अपघात प्रकरण : आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहावं लागणार
Navneet Rana defeat in Lok Sabha still BJP leader support and made big statement
Next Article
लोकसभेत पराभूत तरीही भाजपकडून बळ; नवनीत राणांबद्दल या बड्या नेत्याचं विधान चर्चेत