पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघातात अल्पवयीन आरोपीला पहिल्याच दिवशी अटक केली होती आणि त्यानंतर बाल न्याय बोर्डाने त्याला शिक्षा सुनावली होती. ज्यामध्ये 'अपघात'या विषयावर 300 शब्दाचा निबंध, वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम अशी शिक्षा देण्यात आली होती. मात्र आता बाल न्याय बोर्डाच्या निकालामध्ये एक ट्विस्ट समोर येत आहे. पुणे पोलिसांनीच बाल न्याय मंडळाच्या निकालावर आक्षेप घेतला आहे.
या निकालामध्ये जारी केलेल्या नोटीसमध्ये तिघांच्या स्वाक्षरी अपेक्षित आहे. मात्र बाल न्याय मंडळाने रविवारी दिलेल्या निकालावर एकाच स्वाक्षरी दिसून येत आहे. त्यामुळे दिलेला निकाल अवैध ठरवून पुन्हा एकदा ही केस खुली केली आहे. बाल न्याय मंडळाच्या निकालावर तीन सह्या अपेक्षित आहेत. मात्र निकालानंतर या सह्या करण्यात आल्या नव्हत्या.
नक्की वाचा - पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीचा फास आवळणार!
कल्याणीनगर येथील अपघाताच्या सुनावणीच्या नोटीसीवर फक्त एकच स्वाक्षरी दिसून येत आहे. त्याच्यामुळे हा निकाल ग्राह्य धरला जाऊ नये अशी याचिका पुणे पोलिसांनी केली होती. ती मान्य करून हा निर्णय अवैध ठरवण्यात आलेला असून पुन्हा नव्याने या केसवर सुनावणी होत आहे. यामध्ये पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरोधात 185 कलम लावला आहे. आता दोन्ही पक्षातील युक्तिवाद पूर्ण झालेला असून साडेचार वाजेपर्यंत बाल न्याय मंडळाने ही सुनावणी राखून ठेवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकालाची प्रत पाहिली तर त्यावर बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. एल.एन. धनवडे यांची स्वाक्षरी आहे. मात्र बाल न्याय मंडळाचे दुसरे सदस्य के.टी. थोरात यांच्या नावासमोर सही नाही. न्यायदंडाधिकारींच्या सहीचा रकानाही रिक्त आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world