Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या

Mukhyamantri Ladki Bahin Yojna : काही महिलांनी फॉर्म भरला आहे मात्र पैसे खात्यात जमा झालेले नाही. पैसे खात्या जमा न झाल्याची काय कारणे असू शकतात, यावर एक नजर टाकुया.  

जाहिरात
Read Time: 2 mins

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. 31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. 

लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3 हजार रुपये मिळाले आहेत. ज्या महिलांनी या नंतर अर्ज भरले आहेत, त्यांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील, असं सरकारनं स्पष्ट केलंय. मात्र काही महिलांनी फॉर्म भरला आहे मात्र पैसे खात्यात जमा झालेले नाही. पैसे खात्या जमा न झाल्याची काय कारणे असू शकतात, यावर एक नजर टाकुया.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पैसे जमा न झाल्याची कारणे 

राज्यातील महिलांच्या खात्यात 14 ऑगस्टपासून सरकारने पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे. सरकारने 17 ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सरकारकडून पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे येतील.

(नक्की वाचा- लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा, वाचा कुणाला मिळाले 3 हजार रुपये)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजणेचा फॉर्म भरलेल्या महिलांचं बँक अकाऊंट आधार नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर पैसे खात्यात येण्यास उशीर होऊ शकतो. त्यासाठी महिलांना आधी आपलं बँक अकाऊंट आधारशी लिंक करावं. जेणेकरुन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल. 

Advertisement

तुमचा अर्ज फेटाळला गेला असेल तरी देखील तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. मात्र तुमच्या अर्जाच्या समोर पेडिंग, रिव्ह्युव्ह, डिसअप्रुव्ह्ड असं दिसत असेल तुमच्या अर्जाची छानणी सुरु आहे. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र महिलांना लवकरच योजनेचे पैसे मिळतील.  

(नक्की वाचा-  Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे)

Advertisement

काय आहे लाडकी बहीण योजना?

राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.