डोबिंवलीत शिवसेनेकडून फिल्मी स्टाईल बॅनरबाजी; CM एकनाथ शिंदेंच्या 'कमिटमेंट'ची चर्चा

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी फिल्मी डायलॉग असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी हे बॅनर लावले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

डोंबिवली शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आभाराचे फिल्मी स्टाईल बॅनर्स झळकले आहे. 'एकनाथ शिंदे ने एक बार कमिटमेंट कर दी तो अपनी आप की भी नही सूनता', अशा आशयाचे फिल्मी डायलॉगचे बॅनर डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरात  लावण्यात आलेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे केडीएमसी लगतच्या 27 गावातील प्रश्नांबाबत विविध समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतले. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी फिल्मी डायलॉग असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी हे बॅनर लावले आहेत. 

(नक्की वाचा-  महायुतीत फूट? भाजपकडून काळे झेंडे तर शिंदे गटाचा बहिष्कार; मित्रपक्ष अजित पवारांवर नाराज का?)

बॅनरवरील मजकुरात काय आहे? 

'एकनाथ शिंदे ने एक बार कमिटमेंट कर दी तो अपनी आप की भी नही सूनता. 27 गावांतील मालमत्ता कर, पाणी प्रश्न, जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न यावर तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार', असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. 

(नक्की वाचा-  'अजितदादा म्हणाले, तुमच्यासाठी काय घर विकू", आशा वर्करने पगारवाढीबाबत सुप्रिया सुळेंसमोर मांडली व्यथा)

कल्याण ग्रामीणमधील 27 गावांमध्ये असलेल्या समस्यांबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. या गावांमध्ये वाढीव मालमत्ता कर, पाण्याची समस्या, कामगारांचा प्रश्न आणि इतर काही समस्या होत्या. शिवसेना नेत्यांकडून वारंवार आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे, 27 गावांमधील सर्व पक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे,  शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे,  रवी पाटील, दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत 27 गावांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला गेला.

महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला गेला. 27 गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी अमृत योजनेला आणखी 200 कोटी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयानंतर 27 गावातील जनतेला दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि डोंबिवलीत अनेक भागात मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. 

Advertisement