Mumbai Metro 3: मुंबईतील नवीन लँडमार्क; पाहा सीएसएमटी मेट्रो स्टेशनचा फर्स्ट लूक

सीएसएमटी स्टेशनच्या आत प्रशस्त कॉनकोर्स, पॉलिश केलेले ग्रॅनाइट मजले आणि उंच छत आहे. प्रवाशांसाठी एस्कलेटर, लिफ्ट आणि दृष्टिहीन प्रवाशांसाठी टॅक्टाइल गाईडिंग स्ट्रिप्स देण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

CSMT Metro Station: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशन लवकरच सुरू होणार आहे. मुंबई मेट्रोच्या विस्ताराचा भाग असलेले हे स्टेशन शहराच्या ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे मिश्रण आहे. सीएसएमटी मेट्रो स्टेशनची रचना केवळ एक वाहतूक केंद्र म्हणून नव्हे, तर शहराचा प्रवास दर्शवणारे वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

स्टेशनच्या प्रवेशद्वारावर असलेला काचेचा घुमट मुंबईच्या स्कायलाईनमध्ये सीएसएमटी इमारतीला एक सुंदर फ्रेम देतो. याचे जाळीदार छत दिवसा नैसर्गिक प्रकाशाचा वापर करते, तर रात्री LED दिवे त्याला फ्युचरिस्टिक स्वरूप देतात. मुंबईच्या प्रचंड गर्दीला हाताळण्यासाठी स्टेशनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Mumbai Underground : रस्त्यावर ट्रॅफिक, रस्त्याखालून सुसाट! मुंबईत भुयारी मार्गाने प्रवास, कसा असेल मार्ग?)

स्टेशनच्या आत प्रशस्त कॉनकोर्स, पॉलिश केलेले ग्रॅनाइट मजले आणि उंच छत आहे. प्रवाशांसाठी एस्कलेटर, लिफ्ट आणि दृष्टिहीन प्रवाशांसाठी टॅक्टाइल गाईडिंग स्ट्रिप्स देण्यात आले आहे. दिशादर्शक फलक इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत असल्याने प्रवाशांना स्टेशनमध्ये फिरणे सोपे आहे.

महत्त्वाची कनेक्टिव्हिटी

स्टेशनचे अनेक एक्झिट प्रवाशांना बीएमसी मुख्यालय, जनरल पोस्ट ऑफिस, आझाद मैदान, बॉम्बे जिमखाना, फॅशन स्ट्रीट आणि बॅलार्ड इस्टेट यांसारख्या प्रमुख ठिकाणांशी जोडतात. सीएसएमटी मेट्रो स्टेशन मुंबई मेट्रो शहराची शहरी कनेक्टिव्हिटी मजबूत करते.

Advertisement

वरळी ते कफ परेड या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे ही लाईन पूर्णपणे कार्यान्वित होईल. यामध्ये सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड खालील स्थानके आहेत.

(नक्की वाचा - Golden Metro : मुंबईचा कायापालट निश्चित! 30 मिनिटात सांताक्रूझ ते नवी मुंबई; विमानतळांना जोडणारा भव्य प्रकल्प)

बीकेसी ते वरळी या पहिल्या टप्प्यात धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशी सहा स्थानके आहेत. तर बीकेसी ते आरे कॉलनी या मार्गावर 10 स्थानके आहेत. ज्यात बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 1, सहार रोड, सीएसएमआयए टी2, मरोळ नाका, अंधेरी, सीप्झ आणि आरे कॉलनी जेव्हीएलआर ही स्थानके आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article