Mumbai News : मुंबईतील काळाचौकी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. येथे पाच अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुलीवर हा अत्याचार मागील काही महिन्यांपासून सुरू होता. अखेर या अत्याचाराला कंटाळून मुलीने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
(नक्की वाचा- Vasai Crime : 3 महिन्यात 200 पुरुषांनी शरीराचे लचके तोडले; अल्पवयीन बांगलादेशी मुलीची भयंकर अवस्था)
पोलिसांची तात्काळ कारवाई
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या पाचही मुलांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
(नक्की वाचा - Pune News : सासरकडून छळ, पुण्यात आणखी एका विवाहितेचा बळी)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीला धमकावले होते की, जर तिने कोणालाही याबद्दल सांगितले तर ते तिची बदनामी करतील. त्यामुळे मुलगी इतके दिवस गप्प होती. पण अखेर तिने धाडस करून आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण असून, अल्पवयीन मुलांच्या या कृत्यावर आश्चर्य आणि दुःख व्यक्त केले जात आहे.