जाहिरात

Pune News : सासरकडून छळ, पुण्यात आणखी एका विवाहितेचा बळी

पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरात स्नेहाने आत्महत्या केली आहे. 

Pune News : सासरकडून छळ, पुण्यात आणखी एका विवाहितेचा बळी

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. स्नेहा विशाल झगडे असं आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचं नाव आहे. (girl committed suicide after being harassed by her in-laws)

काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे या तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. पुण्यातील एका उच्चभ्रू कुटुंबात राहत असलेल्या वैष्णवीला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणला जात होता. हे प्रकरण ताजं असताना आणखी एका विवाहित तरुणीला जीव गमवावा लागला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरात स्नेहाने आत्महत्या केली आहे. गळफास घेत तिने स्वत:चं आयुष्य संपवलं. भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. लेकीच्या मृत्यूने तिच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सासरच्या मंडळींविरोधात गंभीर गुन्हे नोंदवा अशी स्नेहाच्या नातेवाईकांकडून मागणी केली जात आहे.

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - जोशी बाईंना फिरण्याची आवड, टूर प्लानिंग करणाऱ्यानेच केला घात; 48 तासात मृत्यूचं गूढ उलगडलं!

या मागणीनंतर स्नेहाचा पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासु विठाबाई झंडगे, दीर विनायक झंडगे, नणंद तेजश्री थिटे, नंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com