Pune News: पुण्यात 'तुकाराम मुंढे' पॅटर्न, तरीही पुणेकरांचं आरोग्य धोक्यात? महापालिकेचा धक्कादायक प्रकार उघड

राज्यात अन्नभेसळविरोधी कारवाईला वेग आला असताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Food Testing Machine Not Available In PMC
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Municipal Corporation News Today :  राज्यात अन्नभेसळविरोधी कारवाईला वेग आला असताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. तब्बल 11 लाख 98 हजार रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेली फूड टेस्टिंग मशीनच गायब झाल्याची धक्कादायक बाब महापालिकेच्या प्रश्नोत्तरातून उघड झाली आहे.

महापालिकेने सुमारे नऊ वर्षांपूर्वी 11.98 लाख रुपये खर्च करून ही फूड टेस्टिंग मशीन खरेदी केली होती. कोंढवा येथील फूड हायजीन अँड हेल्थ लॅबोरेटरीमध्ये या मशीनचा वापर केला जात होता.मात्र,प्रयोगशाळेचा करार संपल्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये तेथील सर्व उपकरणांचा ताबा तत्कालीन पशुवैद्यकीय अधीक्षकांकडे देण्यात आला होता.

Advertisement

नक्की वाचा >> Beautiful Waterfall: महाराष्ट्रातील 'या' पर्यटनस्थळावर होतेय प्रचंड गर्दी, दूधसागर धबधबे पर्यटकांना खुणावतायत

महापालिकेच्या सभेत त्या प्रश्नामुळे सर्वांनाच बसला धक्का

महापालिकेच्या सभेत नगरसेवक महेश वाबळे यांनी ही मशीन सध्या कार्यरत आहे का आणि तिचे सर्व भाग उपलब्ध आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला.त्यावर प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात संबंधित फूड टेस्टिंग मशीन आढळून येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नक्की वाचा >> Neet Exam Result : नीट फेरपरीक्षेचा पुण्यातील विद्यार्थ्याला फटका, रँकमध्ये मोठी घसरण, पालक कोर्टात जाणार

दरम्यान,राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळविरोधी कारवायांना वेग आला आहे.अशा पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील हा निष्काळजीपणा समोर आल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.