माजी सनदी अधिकारी आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या 'पीए'चांही समावेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर नांदेडमधील मुखेड मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

वृत्त सनदी अधिकाऱ्यांना आता आमदारकीचे वेध लागले आहे. अनेक उच्चपदस्थ माजी अधिकारी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांचाही समावेश आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोणते अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर नांदेडमधील मुखेड मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांचे खासगी स्वीय सचिल सुमीत वानखेडे भाजपकडून आर्ली मतदारसंघातून नशिब आजमावत आहेत. याशिवाय संभाजी झेंडे, सिद्धार्थ खरात, रामदास पाटील, विजय नाहटा, प्रभाकर देशमुख हे माजी सनदी अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

(नक्की वाचा- महायुतीत मीठाचा खडा! अमरावतीत नवनीत राणांची बंडखोरी, CM शिंदेंचा इशारा)

निवडणूक लढणाऱ्या माजी अधिकाऱ्यांचा संपत्ती किती? 

बालाजी खतगावकर

  • हातातील रोख रक्कम -24 हजार रुपये
  • 11 तोळे सोने (1 लाख 5 हजार रुपये), बायकोकडे 28 तोळे सोने (1 लाख 40 हजार रुपये)
  • बायकोच्या नावे 13 लाख रुपये किंमतीची गाडी, स्वत:च्या नावावर वाहन नाही 
  • चल मालमत्ता- 52 लाख रुपये, पत्नीच्या नावे 2 कोटी 52 लाख रुपये
  • अचल मालमत्ता- 60 लाख रुपये, पत्नीच्या नावे 4 कोटी 37 लाख रुपये

( नक्की वाचा : 'PM मोदींना नोबेल शांतता पुरस्कार द्या', दिग्गज गुंतवणूकतज्ज्ञांनी केली मागणी )

संभाजी झेंडे (माजी जिल्हाधिकारी)

  • हातातील रोख रक्कम 4 लाख 18 हजार रुपये
  • बायकोच्या हातातील रोख रक्कम 3 लाख 89 हजार रुपये
  • चल मालमत्ता- 2 कोटी 67 लाख 49 हजार रुपये, बायकोच्या नावे 96 लाख 17 हजार रुपये
  • अचल मालमत्ता - 4 कोटी 85 लाख 44 हजार रुपये, तर बायकोच्या नावे 5 कोटी 39 लाख रुपये

सिद्धार्थ खरात (सहसचिव पदावरून राजीनामा)

  • चल मालमत्ता- 91 लाख 26 हजार रुपये, बायकोच्या नावे 1 कोटी 38 लाख 93 हजार रुपये
  • अचल मालमत्ता- 2 कोटी 52 लाख 87 हजार रुपये, बायकोच्या नावे 1 कोटी 21 लाख रुपये 

Topics mentioned in this article