Satara News : सातारा-पुसेगाव मार्गावर फॉर्च्युनर आणि बोलेरोची समोरासमोर धडक, 10 वारकरी महिलांसोबत भयंकर घडलं

सातारा-पुसेगाव रस्त्यावर आज शुक्रवारी 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर आणि बोलेरो कारचा भीषण अपघात झाला.

जाहिरात
Read Time: 1 min
Satara Car Accident News Today

राहुल तपासे, प्रतिनिधी 

Satara Accident News Today : सातारा-पुसेगाव रस्त्यावर आज शुक्रवारी 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर आणि बोलेरो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दहा महिला जखमी झाल्या आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संवादे गावच्या दहा महिला जखमी

मिळालेल्या माहितीनुसार,पुसेगाव हद्दीतील कृष्णकुंज रोपवाटिका आणि हॉटेल रत्नदीपसमोर साताऱ्याकडून पुसेगावकडे जाणारी फॉर्च्युनर आणि पुसेगावहून साताऱ्याकडे येणारी बोलेरो यांच्यात समोरासमोर धडक झाली.त्यानंतर दोन्ही वाहने उलटली.या अपघातात बोलेरोमधील संवादे गावच्या दहा महिला जखमी झाल्या.

Advertisement

नक्की वाचा >> Kolhapur News: भाजप कार्यकर्ता गोळीबार प्रकरण! रफिक मुल्ला, शहाबाज मुल्लाला पकडलं, पोलिसांना मिळाली आतली खबर

परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी घेतली धाव

या महिला फलटण तालुक्यातील सोळ येथे ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होत्या.फॉर्च्युनरमध्ये तीन जण प्रवास करत होते. त्यापैकी एकजण जखमी झाला आहे. अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलांना बोलेरोमधून सुरक्षित बाहेर काढले आणि रूग्णालयात दाखल केले.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नक्की वाचा >>  Kalyan News: कल्याणच्या वकिलाला रंगेहाथ पकडलं, 21 महिला वकिलांची पोलिसांत तक्रार, धक्कादायक प्रकरणाने खळबळ