जाहिरात

Kalyan News: कल्याणच्या वकिलाला रंगेहाथ पकडलं, 21 महिला वकिलांची पोलिसांत तक्रार, धक्कादायक प्रकरणाने खळबळ

कल्याण न्यायालय परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ॲडव्होकेट महेश जाधव यांनी अनेक महिला वकिलांच्या आयफोनमधील डेटा एअरड्रॉप (AirDrop)द्वारे स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Kalyan News: कल्याणच्या वकिलाला रंगेहाथ पकडलं,  21 महिला वकिलांची पोलिसांत तक्रार, धक्कादायक प्रकरणाने खळबळ
Kalyan Advocate Mahesh Jadhav News

Kalyan Advocate Mahesh Jadhav News : कल्याण न्यायालय परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ॲडव्होकेट महेश जाधव यांनी अनेक महिला वकिलांच्या आयफोनमधील डेटा एअरड्रॉप (AirDrop)द्वारे स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका महिला वकिलाने अॅडव्होकेट महेश जाधव यांना रंगेहाथ पकडलं आणि त्यांना बेदम चोप दिला.संतप्त महिला वकिलांनी महेश जाधव यांना जाब विचारला.त्यानंतर त्यांना न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश सय्यद यांच्या समोर नेण्यात आले.न्यायालयाने तातडीने महात्मा फुले पोलीस ठाण्याशी संपर्क साधत पोलिसांना पाचारण केले. 

महिला वकील आणि इतर संबंधित व्यक्ती पोलीस ठाण्यात पोहोचले आणि..

यानंतर ॲडव्होकेट महेश जाधव, तक्रारदार महिला वकील आणि इतर संबंधित व्यक्ती महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणात आतापर्यंत 21 महिला वकिलांनी तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.महेश जाधव यांनी केवळ महिला वकिलांचाच नव्हे,तर इतर अनेक नागरिकांबाबतही अशाच प्रकारे डेटा आणि फोटो घेतल्याची चर्चा आहे.

नक्की वाचा >> Kolhapur News: भाजप कार्यकर्ता गोळीबार प्रकरण! रफिक मुल्ला, शहाबाज मुल्लाला पकडलं, पोलिसांना मिळाली आतली खबर

एअरड्रॉपच्या माध्यमातून मिळवलेला हा डेटा नेमका कोणत्या उद्देशाने वापरला जात होता,याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.महात्मा फुले पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांच्या तपासातून नेमके काय तथ्य समोर येते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Disclaimer : या वृत्तातील आरोपांची अधिकृत पुष्टी आणि पोलिस तपासाचा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच संबंधित आरोपांची सत्यता स्पष्ट होईल.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com