अमोल गावंडे, प्रतिनिधी
एखाद्या देवस्थानला किंवा पर्यटनस्थळावर गेल्यावर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो कार पार्किंगचा. मात्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आता शेगावातील मंदिर परिसरात अतिशय हायटेक आणि ऑटोमोटेड असं वाहनतळ उभारण्यात आलं आहे. त्यामुळे शेगावात येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंगचा मोठा प्रश्न मिटला आहे. विशेष म्हणजे येथील वाहनतळ इतकं हायटेक करण्यात आलं आहे, की आता याची भाविकांना भुरळ पडली आहे.
'10 दिवसात उत्तर द्या अन्यथा...', IAS पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पोलिसांकडून नोटीस
संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला येणाऱ्या देश विदेशातील भक्तांच्या सोयीसाठी संस्थानाने वाहतळ उभारलं आहे. चार एकर जागेत अतिशय प्रशस्त आणि भव्य असं वाहनतळ आहे. सगळीकडे स्वच्छ्ता तर आहेच पण या वाहनतळामध्ये पाच हजार कारसह तीन हजार दुचाकीचं दिवसभरात ये-जा करता येईल इतकी क्षमता आहे. संपूर्णतः ऑटोमेटेड असं हे वाहतळ आहे. तुमचं वाहन पार्क करण्यासाठी A ते Z पर्यंत वेगवेगळे झोन तयार करण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये 200 कार पार्क करता येतील इतकी क्षमता आहे.
अत्यंत सोपी अशी कार लोकेशन आयडेंटीफिकेशन सिस्टीम, स्वच्छ परिसर यांसारख्या विविध गोष्टींमुळे देशभरातील एकमेव देवस्थानात अशा प्रकारची पार्किंगची व्यवस्था असेल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली असून हे वाहनतळ मंदिराच्या अगदी जवळ असल्याने तुमच्या वाहनातून उतरल्यावर सहज दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world