राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या ठाण्यात भाजपने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. सर्वात आधी ठाण्याचे पालकमंत्रिपद भाजपने आपल्याकडे ठेवले. गणेश नाईक यांनी आता ठाण्यात जनता दरबार सुरु करत पक्ष विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर "राजकारणात कायमस्वरूपी कुणा एकाचाच प्रभाव राहत नाही" असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाण्यात 'जनता दरबार' आयोजित करण्याबद्दल गणेश नाईक यांनी म्हटलं की, "मी या जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो. त्यावेळी दर आठवड्याला मी जनता दरबार येथे भरवायचो. भाईंदरला दर 15 दिवसांनी जनता दरबार करायचो. जनतेशी जवळीक वाढावी आणि जनतेच्या समस्या समजून घेता याव्यात यासाठी जनता दरबार आहे."
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
यामध्ये कुठलीही स्पर्धा वैगेर नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार काम करत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार असं या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वात सरकारचा कारभार सुरु आहे. मंत्रिमंडळ अतिशय चांगले निर्णय घेत आहे. 100 दिवसांच्या कामाची पूर्तता म्हणून जनतेकडे जाऊन त्यांना समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. जनताभिमूख राज्य कारभार ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे, ती पूर्ण करण्याकरता हा सगळा प्रयत्न आहे, असं गणेश नाईक यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपाकडून शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर मोठ्या नेत्यांना पाठवलं जात आहे असा विरोधक आरोप करतात? या प्रश्नावर बोलताना गणेश नाईक यांनी म्हटलं की, "राजकारणात कायमस्वरूपी कुणा एकाचाच प्रभाव राहत नाही. राजकारणात चढ-उतार हे येतच असतात. यापूर्वी ठाण्यात रामभाऊ माळगे, रामभाऊ कापसे, 15 वर्षे मी पालकमंत्री होत. त्यामुळे कुणाचं एकाचंच अस्तित्व टिकेल असं नाही. जनतेला जो आवडेल त्याला जनता स्वीकारेल. ठाण्याच्या जनतेने आम्हालासुद्धा जवळ केलं होते."
(नक्की वाचा- Manmad News : लढवय्या नेता हरपला; ठाकरे गटाच्या नेत्याचं अपघाती निधन)
गणेश नाईक यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरु होत्या. आता गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.