Ulhasnagar News : बांगलादेशींना पकडण्यासाठी शिवसेना मैदानात, माहिती देणाऱ्यांना 1111 रुपयांचं बक्षिस

Ulhasnagar Bangladeshi News : मागील काही दिवसात अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या अनेक बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, उल्हासनगर

बांगलादेशी नागरिकांचं भारतातील अवैधरित्या वास्तव्य हा अत्यंत कळिचा मुद्दा आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी देखील बांगलादेशी आहे. त्यामुळे बांगलादेशींविरोधात प्रशासनादेखील जोरदार कारवाई सुरु केली आहे. अशात बांगलादेशींविरोधात आता शिवसेना मैदानात उतरली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उल्हासनगरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची माहिती द्या आणि 1111 रुपयांचं बक्षीस मिळवा, अशी घोषणा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर महाराज यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शहरात बॅनर्स लावत नागरिकांना आवाहन केल आहे.

( नक्की वाचा : Guillain-Barre syndrome : 'सकाळी उठल्यावर लक्षात आलं...' GBS ची लागण झालेल्या रुग्णानं सांगितला अनुभव )

मागील काही दिवसात अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या अनेक बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाराही बांग्लादेशी नागरिक असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पोलिसांनी बांग्लादेशी नागरिक शोधण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. 

(नक्की वाचा- Kolhapur News: पुरेपूर कोल्हापूर! रिक्षांची सौदर्य स्पर्धा, एका पेक्षा एक रिक्षांनी वेधलं सर्वांचं लक्ष)

उल्हासनगर शहरात आतापर्यंत 12 बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजेंद्रसिंग भुल्लर महाराज यांनी आपल्या उल्हासनगर शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास 1111 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे कामावर ठेवण्याआधी त्याची नीट चौकशी करा, असं आवाहन व्यापाऱ्यांना बॅनरच्या माध्यमातून केलं आहे.

Advertisement