मीरा-भाईंदरमधील माजी महिला नगरसेविकांचे गोव्यातील VIDEO व्हायरल, आरोपींवर कारवाईची मागणी

Mira-Bhayander News : व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या  व्यक्तींना अटक आणि गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून न हटण्याचा आक्रमक पवित्रा महिला नगरसेविकांनी घेतला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महिला नगरसेवकांचे गोव्याचे खासगीतले डान्स करणाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माजी महिला नगरसेवकांचा संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी माजी नगरसेविकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मीरा भाईंदर महापालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक दोन दिवसांच्या ट्रीपसाठी गोव्याला गेले होते. या दौऱ्यात काही महिला नगरसेविकांचे डान्स करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यानंतर भाजपच्या संतप्त माजी नगरसेविकांनी नवघर पोलीस ठाण्यात जाऊन संताप व्यक्त केला. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. 

(नक्की वाचा - 'सांगली पॅटर्न'ची वेळ आणू देऊ नका; काँग्रेस नेत्यांचा ठाकरे गटाला इशारा)

अपक्ष आमदार गीता जैन आणि भाजप नेते रवी व्यास यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप भाजप नगरसेविकांनी केला आहे. माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, डिंपल मेहता यांच्यासोबत सर्व नगरसेविका पोलीस ठाण्यात पोहोचल्या. 

(नक्की वाचा- Exclusive - काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित, मात्र दोन आमदारांवर मेहरबानी ?)

नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांना देखील माजी महिला नगरसेविकांनी घेराव घातला. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या  व्यक्तींना अटक आणि गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून न हटण्याचा आक्रमक पवित्रा महिला नगरसेविकांनी घेतला आहे. 

Advertisement