Vasai News : मेडिकल विद्यार्थी ठरला देवदूत; आकाशात झेपावणाऱ्या विमानातील अत्यवस्थ प्रवाशाचा वाचवला जीव

गोवा–मुंबई इंडिगो विमान प्रवासादरम्यान वसईच्या डॉ. आर्यन लोलयेकर याच्या प्रसंगावधानामुळे एका सहप्रवाशाचा जीव वाचला.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी
 
Vasai News : विमानातून प्रवास करताना अनेकांना भीती वाटते. विमानाता आकाशात झेपावल्यानंतर आपल्याला काही झालं तर ही भावना अनेकांना भीतीदायक वाटते. मात्र तुमच्या विमानाक आर्यनसारखा मोडिकलचा विद्यार्थी असेल तर तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. गोवा–मुंबई इंडिगो विमान प्रवासादरम्यान वसईच्या डॉ. आर्यन लोलयेकर याच्या प्रसंगावधानामुळे एका सहप्रवाशाचा जीव वाचला. पालघर जिल्ह्यातील वेदांत मेडिकल कॉलेजचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या डॉ. आर्यन याने विमानातच तातडीने उपचार करून आपले कर्तव्य बजावले.

३ फेब्रुवारी रोजी मुंबईकडे निघालेल्या विमानात एका प्रवाशाला श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागला. क्रू मेंबर्सच्या आवाहनानंतर डॉ. आर्यन यांनी रुग्णाची तपासणी करत रक्तातील साखर झपाट्याने कमी होत असल्याचे ओळखले. त्यांनी त्वरित प्रथमोपचार करत आपत्कालीन विमानात उपलब्ध असलेल्या आपत्कालीन ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. डॉ. आर्यन यांच्या या तत्परतेमुळे काही वेळातच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर सुमारे ४५ मिनिटांच्या प्रवासानंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. तिथे इंडिगोच्या ग्राउंड स्टाफने रुग्णाला पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलवले.

नक्की वाचा - Mobile Apps: मुंबईत जगणं सोपं करतील हे 7 अ‍ॅप्स; वेळ तर 100 टक्के वाचेल

डॉ. आर्यन याच्या या प्रसंगावधानामुळे इंडिगो एअरलाइन्स आणि प्रवाशांनी डॉ. आर्यन याचे टाळ्या वाजवून कौतुक केले असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
 

Topics mentioned in this article