देवा राखुंडे, पुरंदर
गोव्याहून हजरत निजामुद्दीनकडे निघालेल्या एक्स्प्रेसला होणारा मोठा अपघात टळला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. मात्र या घटनेमुळे चार तासांहून अधिक काळ रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिरज-पुणे लोहमार्गावर वास्को निजामुद्दीन एक्स्प्रेसला होणारा मोठा अपघात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला गेला आहे. गोव्यावरून निघालेली हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या ट्रेनच्या चाकातून अचानक धूर येत होता. नीरा रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी ही घटना पाहिली आणि तात्काळ ही गाडी थांबवली.
(नक्की वाचा- हातावर मेहंदी, सूटकेसमध्ये मृतदेह; काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येने खळबळ)
कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. पाच तासांनंतर रेल्वेचा बिघाड झालेला डबा नीरा रेल्वे स्टेशनवर सोडून ही रेल्वे पुढे मार्गस्थ झाली आहे. मात्र यामुळे पाच तासांहून अधिक वेळ मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
(नक्की वाचा- Hyperloop Track : अवघ्या अर्ध्या तासात 350 किमीचा प्रवास; देशातील पहिला हायपरलूप टेस्टिंग ट्रॅक तयार)
गोवा येथून हजरत निजामुद्दीनकडे निघालेल्या एम 2 डब्याच्या चाकातून धूर निघत होता. नीरा रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ गाडीच्या गार्डला लाल सिग्नल दिला. गाडी आहे त्या स्थितीत पहाटे 5 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत तशीच उभी होती. त्यामुळे मागून येणारी पहाटेची सह्याद्री एक्सप्रेस, दर्शन एक्सप्रेस, पुणे-सातारा डेमो या प्रवासी गाड्या मागे अडकून पडल्या. यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला.