जाहिरात

Donation to Shirdi Sai Baba : सोन्याचे भाव गगनाले भिडले; साईबाबांच्या दरबारी मात्र सोन्याचं 'महादान'

गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख ६७ हजारांच्या पुढे गेले आहेत.

Donation to Shirdi Sai Baba : सोन्याचे भाव गगनाले भिडले; साईबाबांच्या दरबारी मात्र सोन्याचं 'महादान'

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Donation to Shirdi Sai Baba : अमेरिका-इस्त्रायल-इराणमधील संघर्षादरम्यान जागतिक पातळीवर मोठी परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख ६७ हजारांच्या पुढे गेले आहेत. सोने-चांदीचे भाव किती ही गगनाला भिडले असले तरी शिर्डीत साईभक्तांकडून साईबाबांच्या चरणी सुवर्ण दानाचा ओघ सुरूच आहे.

देश-विदेशातील लाखो भाविक आपल्या श्रद्धेप्रमाणे श्रींच्या सेवेत योगदान देत असतात. अशाच भक्तीभावातून साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी साईबाबांच्या चरणी एक अनोखी आणि आकर्षक सुवर्ण देणगी अर्पण केली आहे.

नक्की वाचा - Shirdi News : ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीत धक्कादायक प्रकार, जमावाकडून व्यक्तीला जबर मारहाण

४६ लाखांची सोन्याची ‘ॐ' अक्षरे भेट... 

डॉ. सुरेश हावरे यांनी सुमारे ३०९ ग्रॅम वजनाची नक्षीकाम असलेली सहा सुवर्ण ‘ॐ' अक्षरे साईबाबांना अर्पण केली असून या सुवर्ण दानाची एकूण किंमत ४६ लाख ९ हजार ७४ रुपये इतकी आहे. ही सुवर्ण ‘ॐ' अक्षरे विधीवत पद्धतीने साईबाबा समाधी मंदिरातील मूर्तीमागील भिंतीवर बसविण्यात आली आहेत. या भक्तीपूर्ण देणगीनंतर साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते डॉ. सुरेश हावरे यांचा सत्कार करण्यात आला.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com