राहुल कुलकर्णी, NDTV मराठी
राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक भेट दिली आहे. खरीप 2023 हंगामातील प्रलंबित विमा नुकसान भरपाई रुपये 1927 कोटी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. खरीप 2023 हंगामात राज्यात एकूण साधारण 7621 कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबवण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या 110 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे. त्या ठिकाणी 110 टक्क्यांपर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते.
या तत्त्वानुसार खरीप 2023 हंगामातील मंजूर 7621 कोटींपैकी विमा कंपनीमार्फत 5469 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी 1927 कोटींची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होते.
( नक्की वाचा : 'शरद पवार म्हणजे मिनी औरंगजेब', दीड महिन्यात.... भाजपा नेत्याची जोरदार टीका )
प्रलंबित नुकसान भरपाई
- नाशिक 656 कोटी
- जळगाव 470 कोटी,
- अहमदनगर 713 कोटी,
- सोलापूर 2.66 कोटी
- सातारा 27.73 कोटी
- चंद्रपूर 58.90 कोटी