जाहिरात

पुण्याहून मुंबईला निघालेल्या मालगाडीचा ब्रेक फेल, खंडाळा घाट उतरताना काय घडलं? पाहा थरारक व्हिडीओ

पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मालगाडीचा ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना घडली.  मुंबई-पुणे मार्गावर लोणावळा ते कर्जत दरम्यान पळसदरी येथे घाट उतरताना मालगाडीचा ब्रेक फेल झाला.

पुण्याहून मुंबईला निघालेल्या मालगाडीचा ब्रेक फेल, खंडाळा घाट उतरताना काय घडलं? पाहा थरारक व्हिडीओ
Brake Fail Goods Train Video Viral
पुणे:

मेहबुब जमादार, प्रतिनिधी 

Goods Train Video Viral : पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मालगाडीचा ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना घडली.  मुंबई-पुणे मार्गावर लोणावळा ते कर्जत दरम्यान पळसदरी येथे घाट उतरताना मालगाडीचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर या गाडीचं नियंत्रण सुटलं आणि ही गाडी वेगाने धावली.   ब्रेक फेल मुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी नियंत्रणाच्या बाहेर धावत होती.दरम्यान, डब्ल्यू ए जी 12 इंजिन चे लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर म्हणजे टी एम यांनी समन्वय साधत कर्जतच्या पुढे ही गाडी सुरक्षितपणे थांबवली.या मालगाडीला असलेले लोको पायलट,सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाहीय.रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं मोठ्या अपघाताचा अनर्थ टळला. या मध्ये काही प्रशिक्षणार्थी लोको पायलटही होते. 

इथे पाहा ब्रेक फेल झालेल्या मालगाडीचा व्हिडीओ

पळसधरी ते खंडाळाच्या मध्ये बँकर लोकोच्या ब्रेक यंत्रणेमध्ये काहीतरी बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून मालगाडी प्रचंड वेगाने धावत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा >> Akola News : अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ, 'हा' परिसर टार्गेटवर? गुपचूप केली कारची चोरी, पाहा CCTV व्हिडीओ

मध्य रेल्वेच्या कर्जत ते लोणावळा दरम्यान खंडाळा घाटातली ही घटना घडली. गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी तीन इंजिन असलेली के एल एम जी मालवाहू गाडी उतारावर अचानक वेगाने धावू लागली. कशामुळे ब्रेक फेल झाला?याचा संपूर्ण तपास रेल्वे यंत्रणांकडून सुरु असल्याचं समजते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com