Divyang Mobile Shop On E Vehical : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. यापैकीच एका महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. Mobile Shop On E Vehical असे या योजनेचे नाव आहे. दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (Mobile Shop On E Vehical) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.
वर्ष 2024-25 करिता दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने ही योजना लागू करण्यास 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
योजनेचे उद्देश काय आहेत?
-
दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
-
त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
-
सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांसह जीवन जगण्यास सक्षम करणे.
कधी आणि कुठे कसा करावा अर्ज?
योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांकरिता https://register.mshfdc.co.in हे नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: Mhada Lottery: म्हाडा पुणे मंडळातर्फे 3662 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, 'या' दिवशी होणार लॉटरी)
अर्ज करण्याची अंतिम मुदत?
6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय- सामाजिक न्याय भवन, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण इमारत, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे येथे संपर्क साधावा, असेही महामंडळाचे पुणे जिल्हा व्यवस्थापक सी. के. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.