जाहिरात

Mhada Lottery: म्हाडा पुणे मंडळातर्फे 3662 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, 'या' दिवशी होणार लॉटरी

पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3,662 सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत होणार आहे.

Mhada Lottery: म्हाडा पुणे मंडळातर्फे 3662 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, 'या' दिवशी होणार लॉटरी
पुणे:

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे  पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3,662 सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत होणार आहे. त्यासाठीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत होणार आहे.  बुधवारी 29 जानेवारीला   दुपारी 1 वाजता पुणे जिल्हा परिषद सभागृहात ही सोडत काढण्यात येणार आहे. 3 हजार 662 सदनिकांसाठी  71,642 अर्ज मिळाले आहेत. अशी माहिती म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुणे म्हाडा तर्फे 10 ऑक्टोबर 2024 ला ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात केली होती. पुणे मंडळातर्फे जाहीर सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 93 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3569 सदनिकांचा समावेश आहे.  सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: हत्या की आणखी काही? 32 वर्षाय विवाहीतेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, आता...

अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या अधिकृत युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे. वेबकास्टिंगची लिंक म्हाडाच्या  https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर व समाजमाध्यम व्यासपीठांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.  विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - Pune Crime news: अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण...

मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन अशा IHLMS 2.0 या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ ठरल्यामुळे नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com