Local Train : लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून प्रयत्न, परिवहन मंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. मुंबई उपनगरातून मुंबई येणाऱ्या लोंढ्यांचा रेल्वेवर भार पडत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: मुंबई लोकल ट्रेनच्या जीवघेण्या प्रवासाबाबत विधानसभेच चर्चा झाली. मुंब्रा स्थानकाच्या नजीकच्या वळणावर परस्परांशी झालेल्या घर्षणामुळे लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करणारे १३ प्रवासी खाली पडून झालेल्या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर पुन्हा एका लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. याच मुद्द्यावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारची भूमिका मांडली. 

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. मुंबई उपनगरातून मुंबई येणाऱ्या लोंढ्यांचा रेल्वेवर भार पडत आहे. त्यामुळे रेल्वेवरील भार कमी करण्यासाठी सरकार मेट्रोचं जाळं उभारण्यावर भर देत आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. त्यामुळे रेल्वे पकडताना लोक जीवाची पर्वा न करता प्रवास करतात. मु्ब्र्यांची घटनाही तशीच आहे, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.  

(नक्की वाचा-  Maharashtra Alchohol Price: 'बार' चा संप तीव्र होणार? आता वाईन शॉपवालेही टाळी देणार)

रेल्वेची संख्या वाढवून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत रेल्वे मंत्र्यांची चर्चा केली आहे. एसी रेल्वेचे दर साध्या लोकला लावता येतील का? यामध्ये एसी ट्रेनप्रमाणे साध्या लोकलच्या डब्यांना देखील बंद होणारे दरवाजे बसवता येतील का याबाबत चर्चा करण्यात आली. जेणेकरून दरवाजावर लटकून पडणाऱ्यांची संख्या कमी होईल. याबाबत मुख्यमंत्र्यांची रेल्वे मंत्रालयाशी सकारात्मक चर्चा सुरु आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

याशिवाय रेल्वेवर अवलंबून न राहता राज्य सरकारनेही काही पावले उचलणे गरजेचं आहे. मेट्रो, पॉड टॅक्सी, जलवाहतूक, रोप वे अशा पर्यायांचा विचार राज्य शासन करत आहे. रेल्वे प्रवाशी महत्त्वाचा घटक असल्याने त्यांचा जीव वाचवणे आपली जबाबदारी आहे, असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.  

Advertisement

(नक्की वाचा - Nalasopara News: भर रस्त्यात ट्रॅफिक पोलिसांना बाप-लेकाने चोपले, फ्री स्टाईल हाणामारीचा video viral)

मुंबईतील रेल्वेतील गर्दीत नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. कधी चेंगराचेंगरीत तर कधी रेल्वे मार्ग ओलांडताना नागरिक मृत्युमुखी पडतात. मध्य रेल्वेवर सर्वाधिक अपघात मृत्यू ठाणे - कल्याण मार्गावर झाले आहेत. २०२४ मध्ये धावत्या लोकलमधून ठाणे ते कल्याण दरम्यान ६१० जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या ३ वर्षात मुंबई लोकलच्या प्रवासादरम्यान ७५६० प्रवासी मृत्युमुखी पडले तर ७२९३ जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
  

Topics mentioned in this article