
सोमवारी म्हणजेच 14 जुलै रोजी महाराष्ट्रतील बार आणि परमिट रुम संपावर गेले होते. आपला संप हा एकच दिवसाचा असेल असे बारवाल्यांनी सांगितले होते. या संपाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला खरा, मात्र अजूनही सरकार दरवाढ मागे घेण्यास तयार नाहीये. त्यामुळे आता बारवाल्यांना प्रश्न पडलाय की पुढे काय होणार ? हाच प्रश्न दारू प्रेमींना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'बार' आणि परमिट रुम मालक मोठ्या संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.
( नक्की वाचा: बारमध्ये दारू पिणे किती महाग होणार? बारवाल्यांचा संपामुळे दारुप्रेमींचा घसा कोरडा पडला )
महाराष्ट्र सरकारने 3 करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या करवाढीच्याविरोधात बारवाल्यांनी संप पुकारला होता. या करवाढीमुळे बारमध्ये मिळणारी दारू महागणार आहे (Maharashtra Alcohol Price News) दारू महागल्याने ग्राहकांची संख्या कमी होईल, व्यवसायावर परिणाम होईल आणि आपला धंदा पूर्णपणे बसेल अशी भीती बार आणि परमिट रुमवाल्यांना वाटते आहे. राज्य सरकारने व्हॅट, परवाना शुल्कात वाढ केल्यानंतर उत्पादन शुल्कही वाढवले होते. उत्पादन शुल्कात 60% वाढवल्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण संपावर जाणार असल्याची घोषणा बारवाल्यांनी केली होती.
( नक्की वाचा:अन्न किती वेळा चावल्यानंतर पचते? 32 वेळा की 36 वेळा? )
सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, सरकारने हे अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घ्यावा अशी बारवाल्यांची मागणी आहे. जर तोडगा निघाला नाही तर जास्त दिवसांच्या संपावर जाण्याची तयारी बारवाल्यांनी सुरू केल्याचे कळते आहे. आता जर पुन्हा संप झाला तर त्याला अधिक धार यावी यासाठी ते महाराष्ट्रातील सगळ्या वाईन शॉप मालकांनाही संपामध्ये उतरण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे. सोमवारी पुकारलेल्या संपामुळे किमान 80 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन यांनी 14 जुलै रोजी एक दिवसीय लाक्षणीय संप करण्याचे सरकारला निवेदन दिले होते. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांना दूरध्वनीवरून त्यांच्या अडचणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून विहित प्राधिकरणासमोर मांडण्याबाबत विनंती करून एक दिवसाचा लाक्षणिक संप न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने बार आणि परमिट रुम संपावर गेले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world