जाहिरात

Pune News : वाहन खरेदी करा अन् आवडता नंबर मिळवा; गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी महत्त्वाची घोषणा

गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांना आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळावेत यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे. 

Pune News : वाहन खरेदी करा अन् आवडता नंबर मिळवा; गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी महत्त्वाची घोषणा

Pune News : गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीचे प्रमाण वाढत असल्याने वाहनधारकांना आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळावेत यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी आगाऊ अर्ज आणि लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळावेत यासाठी काय कराल?

खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंतीचे नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी इच्छुकांनी 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यात अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह आरटीओ कार्यालयात सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून 16 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता लिलाव आयोजित करण्यात येईल.

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाकरिता अर्ज 16 मार्च 2026 रोजी स्वीकारले जाणार असून त्याचा लिलाव 17 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता सहकार सभागृहात करण्यात येणार आहे. लिलावासाठी सादर करण्यात येणारा डीडी “R.T.O., Pune” या नावे नॅशनलाइज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा आणि दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी एकच सीलबंद डीडी स्वीकारला जाईल.

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी, दुकानांबाहेर मोठी झुंबड; वस्तुंसाठी तब्बल 8 दिवसांचं वेटिंग

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1981 च्या नियम 54अ नुसार पसंतीचा नोंदणी क्रमांक 180 दिवसांपर्यंत वैध राहील. लिलावानंतर उर्वरित क्रमांकांसाठी प्रक्रिया https://fancy.parivahan.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असून इच्छुकांनी आधार संलग्नित मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करून पसंती क्रमांक आरक्षित करता येणार आहे. पुणे आरटीओ कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांचेच अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com