कोरोनानंतर मुंबईवर मोठ्या संकटाचं सावट! उंदरांचा सुळसुळाट ठरणार घातक; आरोग्य तज्ज्ञांचा मोठा इशारा

मुंबईत उंदरांचा वाढता सुळसुळाट आणि अस्वच्छतेमुळे 'हंटाव्हायरस' (Hantavirus) पसरण्याचा गंभीर धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर येत आहे. कोरोना आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या संकटातून मुंबईकर बाहेर पडत असतानाच, आता मुंबईवर एका नव्या धोकादायक व्हायरसचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो म्हणजे 'हंटाव्हायरस' (Hantavirus). मुंबईतील वाढती उंदरांची संख्या आणि अस्वच्छतेमुळे हा जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

उंदरांचा वावर मुंबईकरांसाठी ठरणार शाप?

मुंबईतील जुन्या इमारती, व्यावसायिक गोदामे, दाट लोकवस्तीचे भाग (झोपडपट्ट्या) आणि मोठ्या बाजारपेठांमध्ये उंदरांचा वावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. मात्र, जगभरात चिंता वाढवणाऱ्या हंटाव्हायरसचा संसर्ग या उंदरांमुळे मुंबईतही पसरण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)

हंटाव्हायरस कसा पसरतो?

मुंबईतील कामा रुग्णालयाचे डीन डॉ. तुषार पावले यांनी या व्हायरसच्या प्रसाराबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवेद्वारे प्रसार: संसर्गित उंदीर किंवा घुशींची विष्ठा, लघवी किंवा लाळ वाळल्यानंतर तिथली धूळ हवेत मिसळते.
श्वासावाटे संसर्ग: ही दूषित हवा किंवा धूळ जेव्हा माणसाच्या श्वासावाटे फुफ्फुसात जाते, तेव्हा या धोकादायक आजाराचा संसर्ग होतो.
माणसाकडून माणसाला प्रसार नाही: दिलासादायक बाब म्हणजे, काही विशिष्ट प्रजातींचा अपवाद वगळता हा आजार सामान्यत: एका कोरोनासारखा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.

हंटाव्हायरसची लक्षणे

डॉक्टरांच्या मते, हंटाव्हायरसची सुरुवातीची लक्षणे ही अगदी सामान्य तापासारखीच असतात, त्यामुळे अनेकदा हा आजार ओळखणे कठीण होते.

  • तीव्र ताप
  • सतत अंगदुखी आणि डोकेदुखी
  • प्रचंड थकवा जाणवणे
  • गंभीर लक्षण: जर हा आजार वेळेत आटोक्यात आला नाही आणि गंभीर रूप धारण केले, तर रुग्णाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागतो.

(नक्की वाचा-  Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )

बचावासाठी काय करणे गरजेचे?

कोविडच्या संकटानंतर मुंबईतील रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम झाल्या आहेत. मात्र, आजार होण्यापूर्वीच त्याचा प्रतिबंध करणे गरजेचे आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण शहरात व्यापक पातळीवर पेस्ट कंट्रोल (Pest Control) करणे आणि उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात अस्वच्छता होणार नाही, याची काळजी घ्यावी.

Topics mentioned in this article